अस्तित्व फाऊंडेशन मार्फत बेलवंडी येथे दशक्रिया विधी ठिकाणी वृक्षारोपण..
दिनांक २०ऑगस्ट ,श्रीगोंदा :
बेलवंडी येथील प्रगतशील शेतकरी कै बबन खंडू घोडेकर यांच्या आज २०ऑगस्ट रोजी दशक्रिया विधी निमित्त,स्मृती वृक्षाचे रोपन करण्यात आले.
यावेळी होगा नदी तीरी दशक्रिया विधी घाट बेलवंडी येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार ,सावताशेठ हिरवे, संजय डाके, डॉ.अशोक शेलार ,हनुमंत कोथिंबीरे, अशोक आळेकर, आनंदा खेडकर, मिठुशेठ मेमाणे, सुरेश घोडेकर, डॉ. अंकुश घोडेकर आणि अस्तित्व फाऊंडेशनचे अध्यक्ष गोरख आळेकर यांच्या उपस्थितीत वटवृक्षाचे रोपन करण्यात आले.