श्रीगोंदा नगरपालिके मार्फत निकृष्ट कामांचा कळस. विकास कामे कागदावरच ?
दिनांक २०,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहराचा विकास करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे,नगरपरिषद.यामार्फत शहरवासीयांचे विविध मुलभूत प्रश्न निवारण केले जातात.सभेत बसणारे बहुतांश पदाधिकारी निवडणुकांत आपले सर्वस्व पणाला लाऊन निवडून आलेले आहेत.२५० कोटींच्या आसपास अर्थसंकल्प असणाऱ्या श्रीगोंदा नगर पालिकेत जाण्याचा मोह अनेकांना अनावर होतांना ,प्रत्येक निवडणुकांत दिसत आलेला आहे.येथे जाने साधारण माणसाचे काम नाही.कारण,सभेत जाणाऱ्यांची ताकद तेवढी मोठी असणे गरजेची आहे . मात्र,पालिकेच्या सभेत नगरसेवक होऊन जाण्यात प्रत्येकाला एवढा छंद का ? त्याचे उत्तर येथील निकृष्ट कामांत दडलेले आहे ?
श्रीगोंदा नगरपालिकेत सत्ताधारी मंडळींनी निधी आणायचा. निधी विल्लेवाट लावण्यात पालिका प्रशासना बरोबर सभा आहेच. श्रीगोंदा शहरात अनेक वेळा रस्त्यांची कामे झाली. साधारण सहा महिनेही धड रस्ता टिकत नाही. पालिकेने विकास (?) कामा अंतर्गत रस्ते बनविले आहेत. तशेच,नळ योजना राबविण्यात आली आहे. यासाठी जेंव्हा जमीन किंवा रस्ता खोदण्यात आला. त्यावेळी,पालीकेच्या मागील विकासकामांच्या अवशेशांचे थर पाहण्यास मिळाले.मोठ्या प्रमाणत सामान्य श्रीगोंदे करांचा निधी तेथे गाडला गेला आहे. श्रीगोंदा नगरपालिकेत विकास कामे मंजूर केली जातात.प्रत्यक्षात मात्र,काम पूर्णत्वाला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. विकास कामे करतांना,जुने साहित्य जे पुन्हा उपयोगात येऊ शकते,जसे कि,पेल्विक ब्लोक,जुने दिवे,हायम्यास्क,सिमेंट बेंच,नळ्या,वायर,दिव्यांचे पोल,सोलरच्या थाळ्या आणि ब्याटऱ्या इत्यादी चे पुढील विकास कामांत काय होते ? हे कोणत्या नगरसेवकाच्या किंवा पालिका कर्मचाऱ्यांच्या घरी वापरात तर जात नाही ना ? याचे सामान्य जनतेने संशोधन करणे गरजेचे झाले आहे.कारण,या प्रत्येक कामांवर शासनाकडून कोट्यावधींचा निधी पुरवण्यात आला आहे.
जर,प्रत्येक वेळी नवीन विकास कामे मंजूर केली जातात तर, निघालेल्या जुन्या वस्तूं पालिका कोठे साठऊन ठेवत आहे ? हे आणखी निदर्शनास आलेले नाही.पालिका प्रशासनाने सभेच्या मान्यतेने एक हजार सौर दिवे यापूर्वी पालिका कार्यक्षेत्रातील वाड्या वस्त्यांवर बसविले.त्यांची आजची स्थिती काय? शहरात सतरा रस्ते बनविण्यात येत असून,आजच हे रस्ते निकृष्ट कामांचा उत्कृष्ट नमुना ठरत आहेत.एका लाथेत सिमेंटचे डीव्हायडर जमिदोस्त कसे होऊ शकतात ? फिल्टर पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी श्रीगोंदा शहरवासीयांच्या घश्यात घालण्याचा पालिकेचा हेतू काय ? स्वच्तेच्या माध्यमातून सामन्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे कारण काय ? या आणि विविध योजनांच्या माध्यमातून पालिका प्रशासनास,शासनाचा निधी मंजूर होत असून,त्याची पद्धतशीरपणे विल्लेवाट लावण्यात पालिका कोठेही कमी पाडताना दिसत नाही .
नुकत्याच मंजूर झालेल्या वाड्या वस्त्यांवरील विजेचे पोल व दिव्यांचे काय झाले ? पोल कोठेही बसविले नाहीत आणि काम पूर्ण झाल्याचे समजते आहे. या सर्व प्रकारांतून श्रीगोंदा नगरपालिके मार्फत निकृष्ट कामांचा कळस होतांना दिसतोच आहे.शिवाय,शहरातील विकास कामे फक्त कागदावरच असल्याचे समोर येत आहे.