श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची जीवनवाहिनी असलेल्या कुकडीच्या पाण्याचे आवर्तन श्रीगोंदा शहरच्या आसपासच्या गावांना मिळावे या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ परदेशी यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसीलदार यांच्या कार्यालयाच्या छतावर चढत कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी प्रहारचे झेंडे दाखवत आंदोल केले.यावेळी संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.आढळ्गाव,कोकणगाव,हिरडगाव,चांडगाव,भावडी,तांदळी दुमाला,घुगलवडगाव या भागातील शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळावे यासाठी आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी हे आंदोलन करण्यात आले.
प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीहि सहभागी झाले होते.श्रीगोंदा तालुक्यातील नमूद कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे शेतातील पिके आजरोजी पाण्याअभावी जळून चाललेली असून,जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.अश्या परस्थितीत डी वाय १२,१३,१४ या वितरिकां मार्फत शेतकऱ्यांचे भरणे करणे गरजेचे आहे.
यासाठी आढळ्गाव,भावडी,कोकणगाव,शेडगाव येथील तलावात पाणी सोडत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.गेल्या एक महिन्यांपासून कर्जत,जामखेड,करमाळा भागात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे,श्रीगोंदा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असल्याचे आंदोलकांनी नमूद केले आहे.तशेच,आढळगाव भागतील शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी व प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार शेतकरी संघटना व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने श्रीगोंदा तहसील कार्यालया इमारतीवर चढत विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळी,डी वाय १२,१३,१४ चाऱ्यांना पाणी सोडत घोडेगावातील तलाव भरण्यात यावा,सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे,तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा,विद्युत पंपाचे बिल माफ करण्यात यावे,आढळ्गाव गटात एका दिवसात रेशनकार्ड मिळण्यासाठी प्रशासनाने कॅम्प लावावा.२०१७ ते २०१९ दरम्यान देण्यात आलेल्या रेशनकार्ड धारकांना ध्यान्य देण्यात यावे,या प्रमुख मागण्याच्या पूर्ततेसाठी श्रीगोंदा तहसील कार्यलयावर चढून प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात (प्रहारचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते )संतोष पवार,(जिल्हाध्यक्ष )विनोद परदेशी,प्रकाश बेरड,वामन भदे,कृष्णा खामकर,ज्ञानदेव भैलुमे,अजित गायकवाड,माधव बनसोडे ,विजय शेंडगे,संतोष गायकवाड,भागवत व्यवहारे,सुभाष गांजूरे,सह वंचित बहुजन आघाडीचे कांतिलाल कोकाटे या आंदोलनात सक्रीय होते.