जातनिहाय मतदात्यांचा सर्व्हे करणाऱ्या जि.पि.आर.एस.कंपनीच्या प्रतिनिधीवर उमाप यांची कारवाईची मागणी…
दिनांक २६ ऑगस्ट,श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील मतदात्यांच्या मताचा कौल जाणून घेण्यासाठी,News India आणि Today यांच्यासाठी GPRS (ग्लोबल प्रोफिसिंइंट रिसर्च सर्विस लिमिटेड) या कंपनीमार्फत महेश जगताप या कर्मचाऱ्याला,श्रीगोंदा विधानसभा २०१९ साठी मतदात्यांच्या कौल जाणून घेण्यासाठी नेमण्यात आले आहे. त्यानुसार,चालू असलेल्या सर्वे मध्ये हा इसम लोकांकडे जातनिहाय चौकशी करींत असून,ते चुकीचे असल्याचे म्हणत,सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी संदीप उमाप यांनी श्रीगोंदा पोलिसांना तक्रारी अर्ज दिला आहे.
आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी,नमूद एजंशीचा कर्मचारी जगताप त्याच्या नमूद कामात असतांना. ससाणेनगर,श्रीगोंदा परिसरात आल्यावर,त्याने त्याचा कंपनीच्या सर्व्हे मध्ये स्थानिकांचे मत नोंदवीत असतांना, त्याबरोबर जात,धर्म अश्या बाबी नमूद करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला.हि बाब संदीप उमाप यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संबंधित इसमावर कारवाई साठी पोलिसांत तक्रारी अर्ज दिला. उमाप यांनी सदर व्यक्तीकडे शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना.जगताप हा इसम जातनिहाय सर्व्हे करतांना आढळला असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार त्यावर कायदेशीररीत्या कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.यानंतर,पोलिसांनी संबंधीत जगताप यास समज दिली असल्याचे समजते आहे.
GPRS कंपनीमार्फत असे कर्मचारी नेमण्यात आले असून,महेश जगताप याला विधानसभा २०१९ साठी श्रीगोंदा येथे घर ते घर जाऊन,मतदात्यांकडून माहिती संकलित करण्याचे काम दिले आहे.यातून संकलित होणारी माहिती विधानसभा निकालाच्या कालखंडात,अध्ययन करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे कंपनीने कळविले आहे.