श्रीगोंदा शहर अस्वच्छतेच्या विळख्यात,नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

शहरात डेंगू सदृश्य आजाराचे ८ तर,साथीच्या आजारांचे ४१ रुग्ण..

दिनांक २७ ऑगस्ट,श्रीगोंदा:
श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाचा आरोग्य विभाग,स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे,सामान्य शहर वासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.डेंगू सदृश्य आजाराचे ८ रुग्ण श्रीगोंदा शहरात आढळून आले असून,साधारण साथीच्या आजाराचे लक्षण असणारे ४१ रुग्ण शहरात निदर्शनास आले आहेत.मिळालेली आकडेवारी हि फक्त श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची असून,याव्यतिरिक्त खाजगी रुग्णालयात याचे लक्षणीय प्रमाण असल्याचे समजते आहे.श्रीगोंदा नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचे हे परिणाम असल्याचे सामन्यांची प्रतिक्रिया आहे.
श्रीगोंदा नगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ऑगस्ट महिन्यात एकदाही पेस्ट कंट्रोल , फोगिंग , पावडर फवारणी केली नसल्याने,श्रीगोंदा शहरात तशेच,नगरपालिका कार्यक्षेत्रात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे.वाढलेले गवत,माजलेले डुकर,गायी,जनावरे,भटकी कुत्री यांचा घाणीच्या ठिकाणी वाढता वावर संसर्गजन्य आजार वाढवण्यासाठी कारणीभूत असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.कचरा कुंड्या अनेक दिवसांपासून खाली करण्यात आलेल्या नाहीत.कचरा गोळा करणाऱ्या गाड्या ह्याही या संक्र्मानास कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.कारण,रोज कचरा गोळा करण्याच्या निमित्ताने गाड्या धुणे हा प्रकार पालीकाकेच्या काना मागे पडला आहे.हि कचरा गोळा करणारी घंटागाडी रोज गावात न धुता फिरल्यानेही थेट सामन्याच्या घरांपर्यंत आजार दार ठोठवत आहेत.
श्रीगोंदा शहरात भरणाऱ्या आठवडे बाजारातही अशीच अवस्था असून,परिसरात पडलेला भाजीपाल्याचा कचरा वेळेत स्वच्छताः होत नसल्याने सडत आहे.त्याच्या प्रादुर्भावामुळे आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमणावर आजारी असल्याचे समोर येत आहेत.शेजारील खाटिकखान्यात तर फारच गंभीर परस्थिती उद्भवली आहे.आत बांधलेली जनावरे,आणि अस्वच्छतेमुळे मोठ्या दुर्गंधीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.येथून वाहणाऱ्या पाण्यातून जनावरांचे रक्त आणि घाण उघड्या गटारींतून वाहत सिद्धार्थनगरच्या परिसरात असलेल्या लेंडी नाल्यात येत असून,अतिशय मोठ्या प्रमाणत साथीचे आजार येथे पसरलेले दिसून येत आहेत.हा लेंडी नाला थेट बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला व येथील जिल्हा परिषदच्या शाळेला विळखा घालीत,ससाणेनगरच्या शेजारून वाहत जात आहे. त्यामुळे,लहान शाळकरी मुलांसह मोठ्या प्रमाणात येथील दलित बांधवांचे आरोग्य धोक्यात आल्याचे जाणवत आहे.
श्रीगोंदा नगरपालिकेचे शहरातील स्वछतेकडे दुर्लक्ष असल्याने,मोठ्या प्रमणात शहरातील नागरिकांना साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.पालिका या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचा अक्षरशः कळस झाला असून, शहरात आजारने थैमान घातले असल्याच्या सूचना श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाला करव्या लागल्या आहेत.श्रीगोंदा शहरातील व पालिका कार्यक्षेत्रात नुसत्या ऑगस्ट महिन्यात लक्ष्मीनगर येथे १,खाटिक गल्लीत ४ बनकर मळ्यात २ तर जकाते वस्ती येथे १ अशी डेंगू सदृश्य रुग्ण तर साधारण ताप,खोकला,सर्दी बरोबरीने व्हायरल आजाराची लागण झालेले ४१ रुग्ण आढळल्याचे समोर येत आहे.हे सर्व आजार उद्भवन्यामागे वाढलेले गवत,साठलेलं पाणी,भरलेल्या कचरा कुंड्या,न धुतलेल्या घंटा गाड्या,अस्ताव्यस्थ पडलेला कचरा,बाजारात कुजलेला भाजीपाला,सह या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करणारा श्रीगोंदा नगरपालिकेचा आरोग्य विभाग कारणीभूत आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यामागील नपा ची कचरा कुंडी .

खाटीक गल्ली बाहेर तुंबलेल्या गटारी व कचरा.

श्रीगोंदा तलाठी कार्यालया शेजारी पडलेला कचरा.

बाजारात अस्थाव्यस्त पडलेला कचरा.

सिद्धार्थनगर शेजारच्या परिसरात वाहणाऱ्या गटारी.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading