दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी १:२० वाजण्याच्या सुमारास, श्रीगोंदा शहरातील आढळगाव कडे जाणाऱ्या रोड शेजारील संदीप काळे यांच्या घराच्या पाठीमागे आडोशाला,काही तरुण जुगार खेळत असल्याच्या संशयावरून श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. नमूद ठिकाणी हे पाच इसम पैश्यावर जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यानुसार,कारवाई करीत १) सनी राजू घोडके वय २१ वर्ष ,२) किरण रविंद्र शिंदे वय २८ वर्षे ,३) फिरोज हमीद इनामदार वय २८ वर्ष ,४) विशाल रवींद्र घोडके वय ३० वर्ष व ५) शेखर बजरंग घोडके वय वर्षे ३० सर्व राहणार सिद्धार्थनगर, श्रीगोंदा हे ८९० रु रोख रक्कम सह तिरट नावाचा जुगार खेळतांना जुगाराच्या साधनांसह पोलिसांना मिळुन आले. त्याअनुषंगाने,श्रीगोंदा पोलिसांच्या वतीने पोलीस पो.कॉ.समीर अहमद सय्यद यांचे फिर्यादी नुसार नमूद आरोपींच्या विरोधात मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.