मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील सन १२/१३ व त्यांनंतरच्या वाढीव वर्ग व तुकड्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची राष्ट्रीय शिक्षक परिषदेची मागणी …

दिनांक ३० ऑगस्ट रोजी शिक्षण संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

दिनांक २९ ऑगस्ट,श्रीगोंदा:
मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील सन १२/१३ व त्यांनंतर देण्यात आलेल्या ,वाढीव वर्ग व तुकड्यांचे प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची,राष्ट्रीय शिक्षक परिषदे मार्फत शिक्षण संचालक,पुने यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.आज दिनांक २९ ऑगस्ट रोजी,या मागण्यांसाठीचे निवेदन सादर करतांना श्यामराव लवांडे (राज्य समन्वयक,डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद) यांच्या सह चेपटे सर,गावडे सर,खंडागळे सर,पवळ सर आदी शिक्षक उपस्थित होते.
दिनांक २८ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर सर्व विषयास अनुसरून,अनुदान देण्यात आले.मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील २०१२ व १३ मध्ये देण्यात आलेल्या व त्यांतर देण्यात येणाऱ्या नैसर्गिक वर्ग व तुकड्यांचे प्रस्ताव आणखी संचालक स्तरांवरच आहेत.ते प्रस्ताव जोपर्यंत राज्य शासनास प्राप्त होत नाहीत.तोपर्यंत,अनुदान जाहीर होणार नाही.अशी माहिती मा.शिक्षण मंत्री यांनी दिली आहे.तरी, सदरील प्रस्ताव तात्काळ राज्य शासनाकडे पाठवण्यात यावेत,अन्यथा,सर्व मान्यताप्राप्त अनुदानित शाळांतील नैसर्गिक वाढीच्या वर्ग व तुकड्यांवरील शिक्षक,शुक्रवार दिनांक ३० ऑगस्ट पासून शिक्षण संचालक कार्यालय पुणे,येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत.या विषयीचे निवेदन राष्ट्रीय शिक्षक परिषदे मार्फत आज रोजी सादर करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading