मेजर ध्यानचंद म्हणजे भारतीय क्रीडा विश्‍वाला पडलेले सुवर्ण स्वप्नं -(क्रीडाशिक्षक)श्री.नवनाथ बोडखे.

दिनांक २९ऑगस्ट ,श्रीगोंदा:
संपूर्ण भारतामध्ये मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरी केली जाते.रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील संकुलातील महादजी शिंदे विद्यालयामध्ये मेजर ध्यानचंद यांची जयंती क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली.याप्रसंगी,कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे उपप्राचार्य जाधव बी.एस.सर होते.
ध्यानचंद हे भारतीय क्रीडा विश्‍वाला पडलेले एक सुवर्णस्वप्न होते.असे प्रतिपादन नवनाथ बोडखे सर यांनी केले.जोपर्यंत मेजर ध्यानचंद हॉकी क्रीडा क्षेत्रामध्ये होते.तोपर्यंत,भारताच्या क्रीडा खात्यामध्ये सुवर्ण पदकांचा सुवर्णकाळ होता.अशा या महान खेळाडूचा आदर्श समाजातील प्रत्येकाने घेऊन जगभरात देशाची मान उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच,खेळातील सहभागामुळे मानवाचं शरीर निरोगी राहते आणि निरोगी शरीरातच निरोगी मन वास्तव्य करत असते. त्यामुळेच मन,मनगट,मेंदूचा विकास होतो.म्हणून,प्रत्येकाने जीवनातील दररोज एक तास व्यायामासाठी दिला पाहिजे.तरच आपण निरोगी राहू व जीवनातील अपेक्षित यश सुद्धा मिळवू शकू. ‘शरीर माद्यमं खलुधर्मसाधनम्’ असा संदेश क्रीडा दिनाच्या निमित्ताने श्री नवनाथ बोडखे सर यांनी दिला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक यांनी यावेळी, किमान एक हजार पावले चालण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. याप्रसंगी,श्री दत्तात्रय मोरे, महारुद्र तांबे,विलास दरेकर, व पर्यवेक्षक बुधवंत सर यांनी नियोजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख श्री सचिन झगडे सर ,आभार प्रदर्शन सचिन शेळके सर,सूत्रसंचालन श्री.जानराव सर यांनी केले.

रॅलीतील विद्यालयाचे विद्यार्थी.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading