माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या बेहिशोबी संपत्तीची ईडी (सक्त वसुली संचालनया) मार्फत चौकशीची मागणी..

दिनांक २ सप्टेंबर ,श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्याचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे पहिली निवडणूक लढविण्यासाठी साधारण रक्कम नव्हती.लोकवर्गणी करीत पाचपुतेंनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून विजय संपादित केल्याचे सर्वश्रुत आहे.त्यावेळी सर्वसाधारण व्यक्ती म्हणून नावारूपाला आलेल्या,बबनराव पाचपुते यांच्याकडे आज कारखाने,शिक्षण संस्था,आसपासच्या जिल्ह्यात नाही,अशी भव्य हवेली,महागड्या गाड्या इत्यादी भौतिक वस्तू कोणत्या माध्यमांतून निर्माण झाल्या? पाचपुते यांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम आजपर्यंत जरी जमा केली.तरी, एवढ्या मोठ्या भौतिक गरजा पूर्ण करण्याइतपत रक्कम जमा होऊ शकत नाही. म्हणून,बबन पाचपुते यांच्याकडे जमा झालेल्या बेहिशोबी मालमत्तेची,सक्त वसुली संचालनया मार्फत चौकशी करण्याची,गुंडेगाव येथील तरुण (सामाजिक कार्यकर्ते) भाऊसाहेब शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिनांक २९ ऑगस्ट २०१९ रोजी याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री सचिवालयात शिंदे यांनी सादर केले आहे.त्यात त्यांनी नमूद केले आहे की,श्रीगोंद्याचे माजी आमदार व राज्याचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे कारखाने,शिक्षण संस्था,तशेच मुळ गाव काष्टी येथील राहत असलेले करोडो रुपयांची शानदार हवेली व इतरत्र असणारी कोट्यावधी रुपयांची संपत्ती,कशी व कोठून आली? पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यासह आसपासच्या बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांचे उसाचे बिलं अनेक दिवसांपासून थकविले असून,पिडीत शेतकऱ्यांना आत्महत्ये शिवाय पर्याय उरला नाही. ज्यांच्याकडे सुरवातीला निवडणूक लढविण्यासाठी पैसे नव्हते.सामान्य श्रीगोंदा वाशियांच्या लोकवर्गणीतून निवडणूक लढविणारा सामान्य कार्यकर्ता,अचानक अवाढव्य संपत्तीचा मालक कसा झाला? हा श्रीगोंद्यातील साधारण जनतेला पडलेला प्रश्न भाऊसाहेब शिंदे यांनी या निवेदनातुन नमूद केला आहे. माध्यमांना दिलेल्या माहितीत,शिंदे यांनी सांगितले आहे कि,पाचपुतेंनी आजपर्यंत शेतकऱ्यांना लुबाडून घरं भरली आहेत. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या संपत्तीची चौकशी होत असतांना,पाचपुतेंची चौकशी होणे महाराष्ट्र शासनास अश्यक्य बाब नसल्याचे,शिंदेंनी माध्यमांना सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading