श्रीगोंदा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषनची देव नदीतील वाळू तस्करांवर संयुक्त कारवाई ७५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त..

दिनांक ४ सप्टेंबर (आढळगाव)श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात देव नदीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याची माहिती गुप्त माहिती दाराद्वारे मिळाल्यावर ,श्रीगोंदा पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषनच्या संयुक्त विद्यमाने,येथील वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली.मंगळवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल ७५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॅक्टर , मिनी ट्रॅक्टर ,मोटरसायकल ,जेसीबी या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत .श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आढळगाव शिवारातील देव नदीपात्रात ,मध्यरात्री दोनच्या सुमारास या पथकाने छापा टाकला.यावेळी ,मोठ्या प्रमाणात वाळू चालू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले .येथे पोलिसांना दोन जीसीबी दोन ट्रॅक्टर ,दोन मिनी ट्रॅक्टर टाटा सुपर टर्बो कंपनीचा ट्रक,बजाज प्लेटिना,होंडा सुपर स्प्लेंडर असा एकूण ७५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अक्षय सुनील राहिंज (राहिंज वस्ती,काष्टी ) (जेसीबी मालक )संतोष सुपेकर,(ट्रॅक्टर चालक )भास्कर लांडगे,(ट्रॅक्टर मालक)संतोष सुपेकर,( दुसरा ट्रॅक्टर चालक) महेश राजेंद्र भैलुमे,(ट्रॅक्टर मालक)संतोष मिसाळ , (ट्रॅक्टर चालक)भाऊसाहेब जयसिंग सकट,(ट्रक चालक) मंगेश मोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८० चे कलम ३ व १५ नुसार याप्रकरणीआरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.या कारवाईत (सहाय्यक पोलीस निरीक्षक )संदीप पाटील विजयकुमार बेठेकर ,प्रकाश वाघ ,रणजित जाधव ,शिवाजी ढाकणे, दादा शिरसाठ आदींचा समावेश होता.या कारवाई मुळे श्रीगोंद्यातील सबंध वाळूमाफिया मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading