श्रीगोंदा पोलिसांची वाळू तस्करांवर कारवाई १४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

दिनांक ५ सप्टेंबर सांगवी दुमाला श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलिसांमार्फत तालुक्यातील नदीपात्रात चालू असलेल्या वाळू तस्करांवर कारवाईचे सत्र जोर घेत असून ,पोलिसांमार्फत अनधिकृत पणे गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांवर करडी नजर ठेवल्याचे निदर्शनास येत आहे .
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या सूचनेनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या समवेत पोलीस कॉन्स्टेबल बोराडे ,टाके आणि देवकाते सह दोन पंच बरोबर घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगवी तुम्हाला येथील भीमा नदी पात्रात ,चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७:३० च्या दरम्यान,अनधिकृत गौण खनिज उत्खनन करत असलेल्या इसमांना ताब्यात घेत,त्यांच्याकडून जेसीबी, ट्रॅक्टर १ ब्रास वाळू असा एकूण १४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .आकाश राजेंद्र रणपिसे राहणार (सांगवी दुमाला तालुका श्रीगोंदा )या जेसीबी चालक तसेच ट्रॅक्टर चालक राहुल शिवाजी टिळे राहणार (सांगवी दुमाला तालुका श्रीगोंदा ),जेसीबी मालक महेश दिनकर नलगे,राहणार (सांगवी दुमाला तालुका श्रीगोंदा ) तसेच अज्ञात ट्रॅक्टर मालक या सर्वांनी आर्थिक फायद्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करून,अनधिकृत रित्या नदी पात्रातील गौण खनिज उत्खनन केल्याने, पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब टाके यांच्या फिर्यादीवरून वरील नमूद इसमांवर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३ व १५ तसेच भा.द.वि. कलम ३७९ ,३४ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading