जमिनीचा वाद विकोपाला,सिमेंटचा पोल डोक्यात घालून दोन वर्षाच्या मुलाचा खून… वडिलांवर धारदार शस्त्राने वार भानगाव येथील घटना.. ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल.

दिनांक ५ सप्टेंबर,(भानगाव) श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव शिवारात स्वतःची जमीन करून उदरनिर्वाह करणाऱ्या,आदिवासी समाजाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करीत ,शेजारी जमीन कसणाऱ्या आघाव कुटुंबातील लोकांनी जमाव करून, मारहाण करीत ,मुलगा व वडील यास गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने मारहाण केली.यात दोन वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुलाच्या डोक्यात सिमेंट पोल घालून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर पीडित मुलाच्या वडिलाला धारदार शस्त्राने मारत,त्याचे दोन्ही पाय दोन्ही हात यावर वार करण्यात आले आहेत.
यानुसार श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पीडित मुलाच्या आईने खुणा सह, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी जमा काळूकुशा काळे हीच्या फिर्यादीनुसार आज दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजन्याच्या सुमारास,जमिनीच्या वादावरून शेतात येत शेजारी असणारे इसम नामे नाना आघाव,विष्णू आघाव व त्यांचे दोन मुले अशा चौघांनी,पारध्यांचा आमच्या जमिनीत काही संबंध नाही.म्हणत राग अनावर होऊन,जातीवाचक शिवीगाळ करीत,कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला आहे. पारध्यांच्या पुढच्या पिढ्या संपवून टाकू असे म्हणून,तेथे उपस्थित असलेल्या गणेश या २ वर्ष्याच्या मुलाला मारण्याचा उद्देशाने ,त्याच्या डोक्यात सिमेंटचा पोल ने घाव घालून त्याला गंभीररित्या जखमी केले.उपचारासाठी तेथून पळून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात गणेशला त्याची आई घेऊन आली.मात्र,गणेशाचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या सह पती काळकुशा याला जातीवाचक शिवीगाळ करून त्यालाही गंभीर स्वरूपाने दुखापत करण्यात आली आहे. जमा काळे हिच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये भा.दं.वि कलम ३०२ व ३०७ सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४(f)१(s) सह ३(१) आर.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते आहे.

