वंचित,उपेक्षित,पिडीत घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला अगामी निवडणुकीत संधी द्यावी. . .सामान्य श्रीगोंदेकारांची मागणी..

श्रीगोंदा दिनांक ४ सप्टेंबर
श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक पदाधिकारी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा आव आणीत,उभ्या हयातीत पुरोगामी चळवळीचे काम केल्याचा दावा करुन,सामान्य जनतेसमोर आगामी विधानसभेत,चळवळीच्या (फुले,शाहू,आंबेडकरी)विचारांच्या पक्षांकडून लढणार असल्याचे चित्र श्रीगोंदा मतदारसंघात तयार करीत आहेत.वास्तविक पुरोगामी किंवा वंचितांच्या चळवळीशी तीळमात्र संबंध नसणारे बहुतांशी कार्यकर्ते अगामी निवडणुकीसाठी फुले-शाहू-आंबेडकरी विचाराचे पायिक दाखऊन,सामान्यांची दिशाभूल करीत, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न याठिकाणी करीत असल्याची चर्चा आहे.
वास्तविक अनेक वर्षापासून,सदर कार्यकर्ते अनेक सत्ताधारी पक्षांचे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे तळवे चाटत त्यांच्या गोठ्यात संधी प्राप्त न झाल्याने,शेवटी पुरोगामी चळवळीचा आधार घेतांना समोर येत आहेत.परिणामी समाजातील तळागाळात काम करणारे सच्चे भीम अनुयायी यासर्व प्रक्रियेतून लांब असल्याचे दिसत आहेत.निवडणुकीच्या धामधुमीत फुले,शाहू,आंबेडकरांचा आयुष्यभर जप करणारे, या प्रक्रियेत दिसत नाहीत.काहींनी फुले,शाहू,आंबेडकरी चळवळीचा अनेक वर्षांपासून ध्यास घेतल्या सारखे,तसेच पीडित,उपेक्षित आणि वंचितांच्या सर्व अन्याय,अत्याचारांच्या घटनात सक्रिय असल्यासारखे भासवीत आहेत.परिणामी पुरोगामी चळवळीतील पक्षांचा आधार घेत आपले हित साधण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
यांचा चळवळीशी व वंचितांशी कोठेही वैचारिक संबंध नसल्याचे,सर्वांना ज्ञात आहे.आज चळवळीशी बांधिलकी दाखवणारे,यापूर्वी कोण-कोणत्या पक्षातून वाटचाल करीत वंचितांपर्यंत पोहोचले आहेत? याचेही संशोधन होणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कालखंडात दिग्गज आणि सत्ताधाऱ्यांच्या बगलेला राहणारे आज अचानक वंचित आणि उपेक्षित समाजघटकांसाठी काम करण्यास कटिबद्ध झाल्याने,समाजात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. समाजातील पीडित,उपेक्षित आणि वंचित घटकांना अशा संधी साधू व्यक्तींपासून सावध राहत,आपली सामाजिक भूमिका टिकवून ठेवणे गरजेचे आहे.समाजाच्या अन्याय अत्याचारांच्या घटनेत कधीही पुढे न येणारे,शिवाय विरोधकांच्या गोठ्यात स्वतःची भूमिका नमूद करणारे हेच,आज वंचित आणि उपेक्षित घटकांचे नेते असल्याचे भासवत असल्याने, येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने सामान्यांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न असू शकतो , असेही काहींचे मत आहे. समाजासाठी कधीही कार्यरत नसणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजाने त्यांची जागा दाखवून देणे गरजेचे आहे.असा सूर सामान्य व्यक्ती नमूद करतांना दिसत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading