पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर व गजानन बोडखे यांच्या निरोप समारंभासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…
श्रीगोंदा दिनांक ३ सप्टेंबर:
श्रीगोंदा तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात यशस्वी ठरलेले,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर आणि गजानन बोडखे यांचे पदोन्नती निमित्त,निरोप समारंभ श्रीगोंद्यातील तुळशीदास मंगल कार्यालयात संपन्न झाला.दिनांक २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी,श्रीगोंद्याचे(पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव समवेत,श्रीगोंदा पोलीस ठाण्यातील कर्मचारी,व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सह पत्रकार व वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रम प्रसंगी अनेकांनी बोडखे व कर्णवर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलतांना व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीषशेठ पोखरणा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी पदोन्नती झालेल्या या अधिकाऱ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.श्रीगोंदा कार्यक्षेत्रात कार्यरत असतांना,गौरवनीय काम केल्याचे नमूद केले.यानंतर,श्रीगोंदा वकील संघाचे सदस्य दत्तात्रय झराड यांनी या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचा गुणगौरव नोंदवित वकील संघामार्फत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी,पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर व गजानन बोडखे यांच्या बरोबर काम करत असतानाचे अनुभव नमूद केले. काम करीत असतांना आलेल्या अडचणींना न जुमानता,तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था आबादित ठेवण्यात या अधिकाऱ्यांना यश आल्याचे जाधव यांनी यावेळी विशेष नमूद केले. गणपती उत्सव आणि विधानसभेच्या धामधुमीत,श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी पदोन्नती होऊन ठाणे याठिकाणी कर्तव्यावर जात असल्याने,दुःख होत असल्याचे त्यांनी सांगितले.या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास लावण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार रात्री जागत,कोम्बिंग ऑपरेशन करून,सराईत आणि मोक्कातील आरोपी पकडून,शेजारील जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडे सुपूर्त केले.हे करण्यामागे पोलीस उपनिरीक्षक कर्णवर व बोडखे यांच्या टीमचा मोठा वाटा आहे.असे कर्तबगार अधिकारी पुढील कर्तव्यावर जात असतांना,मनापासून दुःख होत असल्याचे जाधव यांनी याप्रसंगी कबूल केले..ग्रामीण क्षेत्रातून शहरी भागात जाताना,तेथील गुन्हेगारी आणि त्याचे स्वरूप या सर्व बाबींचा आढावा घेऊन,पुढील वाटचाल करण्याचा सल्ला जाधव यांनी या अधिकाऱ्यांना दिला.ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात स्लम असून,झोपडपट्यांमध्ये सराईत गुन्हेगारांचे जाळे पसरलेले असते. या सर्व प्रक्रियेत ग्रामीण आणि शहरी भाग लक्षात घेत, आपले कर्तव्य पार पाडावे असेहि त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून सांगितले आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असतांना, पोलीस अधिकाऱ्याने कायद्याच्या बाजूने खंबीर उभा राहने त्याचे आद्य कर्तव्य मानावे.तशेच पुढील कारवाई सक्षमपणे पार पाडावी. श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात काम करतांना बोडखे आणि कर्णवर यांनी अतिशय हुशारीने आणि धाडसाने आपले कर्तव्य पार पाडले असून,यापुढेही त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी आपल्या कर्तव्याचा वापर करावा.अशा सदिच्छा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने त्यांना दिल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी(व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष) सतीषशेठ पोखरणा,(श्रीगोंदा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष) अशोक भाऊ खेंडके,(नगरसेवक)लोखंडे,सतीश मखरे,प्रशांत गोरे,संतोष खेतमाळीस, संतोष क्षिरसागर,(पोलीस उपनिरीक्षक)पाटील,गावित,माळी त्याचबरोबर श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक,व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी,श्रीगोंदा वकील संघाचे सदस्य,पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (पत्रकार) विशाल चव्हाण यांनी केले.तर, आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी मानले.यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला.