पोलीस कारवाईच्या नावाखाली सामन्यांची आर्थिक लुट करणाऱ्या पो.कॉ. वैराळ वर कारवाई ची मागणी..

दिनांक १० सप्टेंबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून,त्यावर पोलीस प्रशासन जोमाने कारवाई करत आहे.मात्र,ही कारवाई करत असतांना,पोलिस प्रशासना मधील काही अधिकारी व कर्मचारी स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.यातून प्रशासनाची फसवणूक व खात्याची बदनामी होत आहे.
असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात मखरेवाडी येथील प्रकरणात घडला आहे.श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा पोलीस कॉन्स्टेबल वैराळ याने दिनांक ४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मखरेवाडी परिसरात शेतामध्ये बसलेल्या मित्रांना जुगार खेळत असल्याच्या कारणावरून दमदाटी करीत,त्यांच्याकडील १ लाख १० हजार रुपये रक्कम व कारवाई दाखउन.वाहन सोडण्यासाठी पाच जणांकडून प्रत्येकी १० हजार प्रमाणे ५० हजार रुपये घेतल्या विषयी,श्रीगोंदा पोलीस स्टेशनल नमूद पोलिस कॉन्स्टेबल वैराळवर कारवाई मागणी केली आहे. याविषयीचा तक्रारी अर्ज श्रीगोंदा पो.स्टे.ला देण्यात आला आहे.
सदर निवेदनात पोलिस प्रशासनामार्फत मागील महिन्यात २० ते २५ अनधिकृत कारवाया करण्यात आल्याचे नमूद केले आहे.अशा पद्धतीने खोट्या कारवाया दाखवणे, साधारण माणसांना फसवणे कायद्याचा धाक दाखवत,त्यांच्याकडून पैसे उकळणे.असा अवैध धंदा पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व त्यांचे दलाल कर्मचारी करीत असल्याचे या उदाहरणाने समोर येत आहे. ३,४ कर्मचाऱ्यांनी मख्ररेवाडीत धाड टाकत, सदर ठिकाणाहून जप्त केलेली स्विफ्ट गाडी पोलीस स्टेशनच्या जवळ आणली व तेथे मोठी आर्थिक तडजोड करून तिला सोडून देण्यात आल्याचा निवेदनात उल्लेख आहे.या प्रकरणी नमूद अधिकाऱ्याला सांगण्यात आले.मात्र,ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.स्विफ्ट गाडीचा विषय काढू नका.ती मोठ्या पुढार्‍याची असल्याने,सोडून देण्यात आली आहे.या नंतर हा प्रकार पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितला.परंतु,त्यांच्या परस्पर हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले आहे.
पोलीस निरीक्षकांनी, पोलीस कॉन्स्टेबल वैराळला या प्रकरणी माहिती मागवली. माहिती उघड झाल्याने व वरिष्ठांपर्यंत प्रकरण कळाल्याने. एक दुचाकी पो.स्टे. मधून चोरीस गेल्याचे त्याने सांगितले.मात्र,रात्रीच नमूद गाडी ५० हजारात सोडल्याचे निवेदनात नमूद केले आहे. घडलेला प्रकार पोलीस स्टेशनला बदनाम करणारा असून, बोगस धाडी टाकणार्‍या,पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करत त्यांच्यावर कारवाई करावी. याविषयीचे निवेदन संतोष खेतमाळीस (शहर प्रमुख शिवसेना),संतोष शिंदे (उप तालुका प्रमुख शिवसेना), हरिभाऊ काळे(युवा सेना तालुका प्रमुख) नाथा पवार,(उप तालुका प्रमुख युवा सेना) अरुण देवकर,राज देवकर यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिले आहे.
पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कामं करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्व-स्वार्थामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असून,यातून साधारण माणसांची आर्थिक पिळवणूक होत आहे. यापूर्वीही काही प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनचा धाक दाखवत पैसे उकळण्याचा काहींनी धंदा केल्याचे उदाहरणे आहेत. मात्र,आता पोलीसच अशा पद्धतीने खोट्या-नाट्या कारवाई करीत,निरपराधां छळणार असतील.तर,(जिल्हा पोलीस अधीक्षक) इशू सिंधू साहेबांना श्रीगोंदा पोलीस ठाण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading