अवैध धंद्यात पोलिसांची भागीदारी,कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार:ऋषिकेश गायकवाड.

दिनांक १० सप्टेंबर,श्रीगोंदा:
जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर,जिल्ह्यातील अवैद्य धंदे हद्दपारीच्या मार्गावर येऊन ठेपले होते. मात्र,प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यां चा अवैद्य व्यवसायकांबरोबरील युतीमुळे,अधीक्षक सिंधू यांच्या नियोजित कारवाईला अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे मटका,दारू,वाळू,जुगार,गुटका व इतर व्यवसाय बंद झाले.परंतु,पोलीस खात्यातील पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ,पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर व पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ यांनी संगनमताने वरील उल्लेख केलेल्या व्यवसायिकांकडून हप्ते गोळा करणे सुरू केले आहे. पोलीस कॉन्स्टेबल रोहित मिसाळ हा गेली गेली दोन-तीन वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्यातील सामान्य नागरिकास कारवाईच्या नावाखाली लाखो रुपयांचे हप्ते गोळा करीत आहे.नमूद पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करीत,त्यांना निलंबित करण्यात यावे. या मागण्यांसाठी ऋषिकेश गायकवाड(तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,श्रीगोंदा)यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर,यांना कारवाईचे निवेदन सादर करीत,कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे.
श्रीगोंद्याचे रहिवाशी असलेले पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर या सर्व प्रक्रियेत सहभागी आहे.दोन्ही पोलिसांचे सर्व अवैध्य व्यवसायकांशी संबंध आहेत.श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैधरित्या वाळू चालूच असून,हे दोघे कर्मचारी जेसीबी यंत्राने व फायबर बोटीच्या माध्यमातून स्वतः,मालक व भागीदार आहेत.या माध्यमातून,वरील पोलिस कर्मचाऱ्यांनी लाखो,करोडो रूपयांची माया गोळा केली आहे. पगाराच्या मानाने त्यांची दहापट संपत्ती आज रोजी आहे.तसेच,इथून पुढे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची प्रशासकीय कारवाई न झाल्यास. ते सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील करून सोडतील.असे गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश वाघ यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला बरेच वर्ष काम केलेले आहे. तेही श्रीगोंद्यात वसुलीचे काम करीत आहेत. त्यांची श्रीगोंद्यातील कारकीर्द अतिशय वादातीत राहिलेली आहे. आर्थिक लूटमार व कारवाईसाठी त्यांनी एलसीबी जॉइंट केले असल्याचे ऋषिकेश गायकवाड यांचे म्हणणे आहे.त्यामुळे पो.कॉ. रोहित मिसाळ,विजयकुमार वेठेकर व प्रकाश वाघ यांनी अवैधरित्या कमावलेल्या बेकायदा मालमत्तेची व कमाईची चौकशी करून,त्यांना निलंबित करावे.अन्यथा,गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथील कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading