हॉलीबॉल’ स्पर्धेमध्ये महादजी शिंदे विद्यालयाला विजेतेपद..

दिनांक ११सप्टेंबर, श्रीगोंदा:
जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर व श्रीगोंदा तालुका क्रीडा समिती यांच्यावतीने महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयांमध्ये पावसाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस व महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेजचे प्राचार्य ज्ञानदेवराव म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाले.या स्पर्धांमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले.
तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये हॉलीबॉल या प्रकारामध्ये महादजी शिंदे विद्यालयाच्या १४ वर्षे वयोगट मुले व १७ वर्षे वयोगट मुले अशा दोन्ही संघांनी तालुकास्तरावर विजेतेपद पटकावले. तसेच जुनिअर विभागातील १९ वर्षे वयोगट मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले. विजेत्या संघांना हॉलीबॉलपटू प्रशिक्षक अजय गाडेकर सर,बजरंग नेटके तसेच क्रीडा विभाग प्रमुख सचिन झगडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष फटाकडे सर, कोषाध्यक्ष निवृत्ती शेलार सर,प्रा.डफळ सर, प्रा.गिरमकर सर तसेच तालुका क्रीडा समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
विजेत्यांचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, उपप्राचार्य बी एस जाधव ,पर्यवेक्षक बुधवंत सर ,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आणि परिसरातील क्रीडाप्रेमींकडून कौतूक होत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading