शेडगाव जळीत प्रकरणातील पिडीत गोरख मारुती भदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू..

दिनांक १३ सप्टेंबर शेडगाव श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी सख्या भावाने व भावजय ने छपराचे दार बाहेरून बंद करून, छप्पर पेटवून गोरख मारुती भदे वय वर्षे ४१ यासह त्याच्या पत्नीस जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता .छप्पर जळाल्यानंतर दार तोडून बाहेर आलेल्या पीडितांना धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली होती. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या व जखमी झालेल्या गोरख भदे यांच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर येथे उपचार चालू होते.काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजनेच्या सुमारास जखमेमध्ये सेप्टिक झाल्याने , त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याविषयी तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे ए.एस.आय. गावित यांना फोन द्वारे माहिती कळविली आहे. त्यानुसार,आरोपी शरद मारुती भदे,रंजना शरद भदे यांच्यासह इतर तेरा जणांसह अनोळखी दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक २६ ऑगस्ट रोजी शेतातील काम करत असलेल्या,गोरख भदे यांच्या ट्रॅक्टरला लाईटची वायर अटकून तुटली.त्यावरून,गोरख व भाऊ शरद यांच्या मध्ये शिवीगाळ व हाणामारी झाली. पोलीस स्टेशनला शरद मारुती भदे याच्यावर गोरख यांनी विनयभंग सह पत्नी मुलगा यांच्यावर इतर गुन्हे दाखल केले होते.श्रीगोंदा पोलिसांनी याप्रकरणी शरद भदे,त्याची पत्नी व मुलगा यांच्यावर दिनांक २७ ऑगस्ट रोजी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.याचा राग अनावर होऊन माझी पोलिसात तक्रार दिली म्हणत,शरद व त्यांच्या कुटुंबातील इसमांनी गोरख व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याच्या उद्देशाने,राहते छपराचे दार बंद करून,पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास छप्पर पेटून दिले होते.दारात लोखंडी टाॅॅमी आणि गुप्ती घेऊन,सख्ख्या भावाला मारण्याच्या उद्देशाने आरडाओरडा करत शिवीगाळ केली होती. छप्पर पेटल्याने आगीचे लोळ आत पडत होते. गंभीररित्या भाजल्याने,गोरख व त्यांच्या पत्नी जीव वाचवण्यासाठी दार तोडून बाहेर आल्या.मात्र, दारात थांबलेल्या शरदने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला .डोक्‍यात व पाठीवर गुप्तीने व टॉमीने वार करीत त्यांना गंभीर जखमी केले .यानंतर,श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले होते.यादिवशी उपचारासाठी गोरख व त्याच्या पत्नीला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते.
५७ टक्के भाजलेल्या गोरख भदे यांचा काल दिनांक १२ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलीस प्रशासनामार्फत समजले आहे.त्याअनुषंगाने शरद भदे सह त्याला या प्रकरणी मदत करणाऱ्या इसमांवर भा.दं.वि. ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नमूद प्रकरणी पीडितांच्या वतीने मृतदेहाचा अंत्यसंस्कार करण्यास थांबविल्याचे समोर आले .२६ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेनंतर आरोपी शरद व त्याच्या पत्नीवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते.पोलिसांनी कारवाई न केल्याने पीडितांवर प्राणघातक हल्ला होत,त्याचा मृत्यू झाल्याचे काहींचे मत आहे.वेळीच आरोपी ताब्यात घेतले असते.तर, दुर्घटना घडली नसती.असेही काहींचे म्हणणे आहे.मात्र,पोलिस प्रशासनाने २७ ऑगस्ट रोजी आरोपींना सी.आर.पी.सी. ४१ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याचे समजते आहे.

मयत गोरख भदे यांच्या मृतदेहास श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घेऊन आलेले पीडित,पोलिसांच्या हलगर्जीपणा मुळे गोरखाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्याकडून बोलले जात होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading