हिंदी भाषेमध्ये देशाला जोडण्याची ताकद : आर. डी. कदम..

दिनांक १४ सप्टेंबर,श्रीगोंदा:
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयांमध्ये,मुंशी प्रेमचंद यांची जयंती हिंदी दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
जे राष्ट्र दुसऱ्याची भाषा स्वीकारतो.ते राष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या गुलाम असते.असे प्रतिपादन हिंदी विभाग प्रमुख आर. डी.कदम यांनी केले.अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना ते पुढे म्हणाले, हिंदी ही आदर असणारी भाषा आहे. हिंदी भाषेमध्ये इतरांना प्रेमभावनेने जोडण्याची शक्ती आहे आणि राष्ट्र एक ठेवायचे असेल.तर,हिंदी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. त्यातूनच राष्ट्राची एकात्मता निर्माण होईल.
याप्रसंगी, विद्यालयाचे प्राचार्य टी.पी. कन्हेरकर सर व गायकवाड सर यांनी मनोगत व्यक्त केले.उपप्राचार्य जाधव बी.एस.व पर्यवेक्षक बुधवंत यु.बी.व सेवकवर्ग उपस्थित होते.तसेच,याप्रसंगी विद्यार्थी मनोगतामध्ये विवेक गिरमकर, ऋतुराज भगत, नागवडे तन्मय पाडळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कृष्णा चिंचकर तर, सूत्रसंचालन हर्षल झगडे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विषय शिक्षक भांगरे सर व सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading