राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या माध्यमांतून भटके-विमुक्त कार्यकर्ते मेळावा संपन्न..

 

 

दिनांक १६ सप्टेंबर, श्रीगोंदा:

 

१५ सप्टेंबर रोजी श्रीगोंद्यात, राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चाच्या माध्यमांतून भटके-विमुक्त कार्यकर्ते मेळावा घेण्यात आला. महाराष्ट्राचे प्रवक्ते कुसाळकर सर यांच्या अध्यक्षतेखाली आजचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यासाठी उपस्थित बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक धनंजय सोनवणे,(राष्ट्रीय भटके-विमुक्त मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष),संजय दगडू सावंत,(छत्रपती क्रांती सेनेचे तालुका अध्यक्ष) समीर,(छत्रपती क्रांती सेनेचे तालुका संयोजक) नितीन गव्हाणे,(आदिवासी परिषदेचे जिल्हाध्यक्ष)सुरेंद्र काळे, (मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष)विलास राहिंज, *भारतीय विद्यार्थी मोर्चाचे तालुकाध्यक्ष)विशाल शिंदे, (भीम आर्मी चे जिल्हा उपाध्यक्ष) तात्यासाहेब घोडके आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी, दादा शामराव शिंदे यांची राष्ट्रीय भटके विमुक्त मोर्चा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. उपतालुका अध्यक्षपदी भाऊसाहेब फुलमाळी यांची निवड करण्यात आली आहे.यांच्या बरोबर श्रीगोंदा शहराध्यक्षपदी कालिदास सावंत यांची निवड करण्यात आली आहे. या मेळाव्यास बामसेफचे (जिल्हाध्यक्ष)विजय गायकवाड,(बहुजन मुक्ती पार्टीचे तालुकाध्यक्ष)डी.आर.जावळे,(राष्ट्रीय भटके मुक्त मोर्चाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष)भगवान शिंदे,सुदाम सावंत,रामदास मधले,दिगंबर काळे,शहाजी शिंदे,गोंडे ,चव्हाण सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading