मुख्यमंत्र्यांच्या सभेत प्रश्न मांडून दखल न घेतलेने, सगळे गावच बसले उपोषणाला..
भाजपा तालुकाध्यक्षाच्या गावात,टँकर व जनावर छावणीसाठी अनोखे आंदोलन..
दिनांक १७ सप्टेंबर,खांडगाव श्रीगोंदा :-
श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव या दुष्काळग्रस्त गावाचे प्रश्न,शनिवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत मांडून, दखल न घेतल्याने येथील ग्रामस्थांनी संभाजी ब्रिगेडचे(जिल्हाध्यक्ष) टिळक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने काल आमरण उपोषण आंदोलन केले. या उपोषणात गावातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उपोषणाला बसला होता.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, खांडगाव गावातील जनावरांची छावणी चालु करावी, जळालेले पिकाचे पंचनामे व्हावेत, पाण्याच्या टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात, जनावरांना पिण्याचे पाणी टँकरद्वारे देण्यात यावे, रोजगार हमीचे काम चालू करण्यात यावे या मागणीसाठी खांडगाव येथील ग्रामस्थ अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. खांडगाव या गावचे सरपंच बाळासाहेब महाडिक हे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष असून त्यांनी मुख्यमंत्र्याच्या सभेमध्ये हा प्रश्न मांडला होता. तरीसुद्धा,प्रशासनाने कसलीच दखल न घेतल्यामुळे काल सरकारच्या विरोधामध्ये,खांडगाव ग्रामस्थांनी संपूर्ण गावातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती उपोषणाला बसली होती. या गावांमध्ये काल शासनाचा आणि प्रशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक यांच्या नेतृत्वाखाली मागील आठवड्यात बांगर्डे येथील संपूर्ण गाव आमरण उपोषणाला बसले होते. सदरील उपोषणानंतर श्रीगोंदा तहसिलचे नायब तहसीलदार ढोले यांनी तातडीने बांगर्डां गावातील चारा छावण्या, पाण्याचे टँकर चालू केले होते. याच यशस्वी आंदोलनाचे महत्व ओळखून काल दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी खांडगाव येथील ग्रामस्थांनी सुद्धा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती उपोषणाला बसवली होती. त्यामुळे या उपोषणाची मांडवगण परिसरासह संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा झाली.
मांडवगणसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या भीषण पाणी टंचाई असून,जनावरांच्या छावण्या पुन्हा चालू करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, जनावरांना पोहोच पाणी द्यावे.यासाठी अनेक गावातील लोक आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. दोन गावांमध्ये हे आंदोलन झाले असून,मांडवगण परिसरातील प्रत्येक गावांमध्ये अशा पद्धतीच्या आंदोलन करून या भागातील प्रश्नांकडे लक्ष वेधले जाईल.तातडीने जनावरांच्या छावण्या व पाण्याच्या टँकरच्या खेपा वाढवले नाही तर सरकार विरोधात गावो गावी निषेध करण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येईल.या मागणीचे निवेदन श्रीगोंद्याचे(नायब तहसीलदार)ढोले व (विस्तार अधिकारी)जगताप,(सभापती)शहाजी हिरवे यांना देण्यात आले. यावेळी, (ना. तहसीलदार) ढोले यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामध्ये असे म्हटले आहे की, २ दिवसांत पाण्याचे टँकर चालू करू. छावणी चालू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांकडे पाठपुरावा करु,जळालेल्या पिकांचे पंचनामे व रोजगार हमीचे कामे २ दिवसांत सुरू होईल.अश्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.याबाबत ची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी माध्यमांना दिली आहे.यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
####################
नाकर्त्या व्यक्तीस जिरायत भाग दाखवून देईल:टिळक भोस
लोकप्रतिनिधी उमेदवारीच्या नादात गुंग असून,त्यांना या भागाचे सोईरसुतक राहिलेले नाही.त्यामूळे,अशा नाकर्त्या व्यक्तीस जिरायत भाग जागा दाखवून देईलच. मात्र,सध्या बांगर्डां,खांडगाव,रुईखेल,कामठी, वलघुड, मांडवगण या परिसरातील चारा छावणी तातडीने चालू करून पाण्याचे टँकर वाढवण्यात यावेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.