६५ एकरातील यशस्वी गृह प्रकल्प प्रयोगानंतर ९ एकरात १०१ नव्या बंगल्यांची मुहूर्तमेढ करणारे ३३ वर्षीय उद्योजक ॲड. वैभव मेथा..

कमी वयात व्यावसायिक प्रगल्भता दाखवत सगळ्यांच्या बजेटमध्ये परवडतील अशी घरे शहराच्या सर्व दिशेने बांधून खऱ्या अर्थानं वैभव मेथा यांनी शहराच्या आणि ग्राहकांच्या जीवनात वैभव निर्माण केले..

श्रीगोंदा शहरातील उद्योजक व बांधकाम व्यवसायातील नामांकित व्यक्तिमत्व ॲड.वैभव मेथा हे श्रीगोंदा पंचक्रोशीत बांधकाम व्यावसायिक व रियल इस्टेट मध्ये प्रगतीपथावर काम करणारे युवक व सक्रिय उद्योजकाबरोबरच ते सामाजिक प्रक्रियेत सक्रिय आहेत. सर्वसामान्यांना मदत करणे, वंचित दुर्लक्षित घटकांना अन्नदान करणे, भगवान महावीर, भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या आणि विचारवंतांच्या जयंती, पुण्यतिथींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आयोजकांना सकारात्मक सहकार्य करण्याचा मानस त्यांनी आजपर्यंत जोपासलेला आहे.

कुटुंबापासून दूर असलेल्या वंचित, पीडित समुदायातील शिक्षण घेणाऱ्या मुलांना ते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या भेट देत त्यांचा वाढदिवस मागासवर्गीय आदिवासी आणि समाजप्रवाहापासून दूर असलेल्या मुलांसोबत साजरा करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे. श्रीगोंदा शहरातील व्यवसाय क्षेत्राबरोबर, सामाजिक प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उद्योजक ॲड.वैभव मेथा यांना वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा..

उद्योजक ॲड. वैभव मेथा यांच्या वाढदिवसानिमित्त…

श्रीगोंदा:- शिक्षण ॲडव्होकेट आणि journalisum degree कोर्स झालेला आहे. त्याच बरोबरच व्यवसाय, व्यापारचे बाळकडू मिळालेल्या वैभव मेथा यांनी पारंपरिक व्यावसाय करण्याऐवजी रियल इस्टेटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. तो देखील वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी..! आणि आज १६ वर्षात मेथा डेव्हलपर्सचा “वेलू गेला गगनावरी” अस म्हंटल्यास वावग ठरू नये.

गेल्या १७ वर्षात सुमारे ३ हजार लोकांना मालमत्ता धारक बनविण्याचा विक्रम ॲड. वैभव मेथा यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे रियल इस्टेट क्षेत्रात ते नवखे होते. आई अनिता आणि वडील दिलीप मेथा यांचे वैभव हे पुत्र त्यांना एक भाऊ एक बहिण आहे.

श्रीगोंदा तालुका पुणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पुणे जिल्ह्यातील धनिकानी २५ वर्षापूर्वी जुनी घरे, वाडे आणि डोंगर लगतच्या जमिनी खरेदी केल्या. त्यामुळे आसपासच्या शेत जमिनीचे बाजार भाव वाढले आणि जमीन, एन ए प्लॉट, वस्तीपड गुंठा यांचे दर वाढले. अशा वेळी वयाच्या १७ व्या वर्षी वैभव मेथा यांनी या क्षेत्रात पदार्पण केले.

रियल इस्टेट हा मोठया शहरात पैसे कमवून देणारा सर्वांच्या परिचित असणारा व्यवसाय.. याला श्रीगोंद्यातील ग्राहकांना पटवून देणे हे अवघड काम.. पण, वैभव मेथा यांनी सातत्य, सत्यता, जिद्दीच्या बळावर ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले. असे म्हंटल्यावर वावगे ठरू नये. श्रीगोंदा शहर हे ऐतीहासिक शहर.. पुढे शहर वाढत गेले. उपनगरे वाढली.. याचे कारण म्हणजे येथील सामाजिक वातावरण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शैक्षणीक संस्था हे होय. शहर लगत फार पूर्वी स्टेशन रोडवरील उपनगर वसले. तदनंतर गेल्या २० वर्षात उपनगरे वाढली नाही. पण केवळ धंदा म्हणून नव्हे.. तर, ज्यांना वडिलोपार्जित घर नाही. त्यांचे जीवनात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते. मात्र, वाढती महागाई, जागेचे गगनाला भिडलेले भाव, बांधकाम खर्च पाहता अनेकांच्या बाबतीत हे स्वप्न दिवास्वप्न ठरते.

अशा लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जिद्द वैभव यांनी व्यक्त केली. जिद्द यासाठी कारण..! अल्प भांडवल असलेल्या ग्राहकांना परवडतील अशा ठिकाणी जागा घेऊन, तेथे बांधकाम करून, ग्राहकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम वैभव मेथा हे करत आहेत. ग्राहकांना देखील याचा प्रत्यय आला आणि त्यांनी मेथा यांच्याशी खरेदीदार आणि विक्रेता असे नाते न ठेवता आपल्या सहकाऱ्यांना घरे घेण्यास आग्रह धरला आणि व्यावसाय वाढत गेला.

२३ मे २०२४ रोजी ९ एकरातील ३ एकर जागा अवघा १ महिन्यात बुकिंग झाली. पहिल्या फेज मधील भूमिपूजन झालेले ११ बंगले देखील बुकिंग झाले. त्यामुळे मेथा यांनी बंगल्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. आज श्रीगोंदा शहरात प्रवेश करणाऱ्या स्टेशन रोड जकाते वस्ती, वेळू रोड, घोडेगाव रोड, बालाजी नगर, मांडवगण रोड, वडाळीरोड, पारगाव रोड या सर्व ठिकाणी वैभव मेथा यांनी ग्राहकांना बंगले बांधून दिलेत.

यातील अनेक ग्राहकांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न केवळ वैभव मेथा यांच्यामुळे शक्य झाले. कारण व्यवसाय म्हणजे टेक अँड गिव्ह तत्व.. परंतु, मेथा यांचे धोरण आहे की, प्रत्येकाला स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्या बजेट मध्ये तसेच आवास योजनेंतर्गत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कर्ज प्रकरण करून दिले. प्रत्येक ठिकाणी नफा नाही. तर, ग्राहकाची अडचण सोडवणे.. याला प्राधान्य दिल्याने, मेथा यांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. काल परवा भूमिपूजन झालेल्या बंगल्याना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

काळानुरुप तंत्रज्ञानात बदल झाले की, व्यवसायात बदल होतात. सुरुवातीच्या काळात मेथा कुटुंबाने बालाजी फर्निचर नावाने मोठे दुकान थाटले. पुढे मोबाईल फोन काळ आला.. मोबाईल शॉप द्वारे टाटा इंडिकॉम आणि लावा मोबाईल अधिकृत विक्रेता, पीयाजो, टाटा एस डीलरशिप द्वारे छोट्या व्यावसायिकाना वाहने दिली व विक्री पश्चात सुविधा देऊन, त्यांचाही विश्वास संपादन केला. सद्या बालाजी मंगल कार्यालयाजवळ मेथा होंडा शोरुम द्वारे दुचाकी वाहनांचे शोरुम असून, त्यालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

या सर्व कार्यबाहूल्यातून वेळ काढून वैभव मेथा यांनी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन, प्रशिक्षण पूर्ण करून वकिली देखील सुरू केली आहे. निवडलेल्या क्षेत्रात सवडीने नव्हे.. तर, आवडीने काम.. केल्यास यशस्वी होता येत.. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वैभव मेथा होय. कमी वयात व्यावसायिक प्रगल्भता दाखवत सगळ्यांच्या बजेटमध्ये परवडतील अशी घरे शहराच्या सर्व दिशेने बांधून खऱ्या अर्थानं वैभव मेथा यांनी शहराच्या आणि ग्राहकांच्या जीवनात वैभव निर्माण केले.. अस म्हंटल्यावर वावगे ठरू नये. आज ३ जून रोजी ॲड.वैभव मेथा यांचा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि भविष्यात व्यवसाय वृध्दीसाठीही सदिच्छा…

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

उद्योगाचा लोगो…
मिशन गर्ल्स हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना अन्नदान करतांना..
परदेश दौऱ्यावर असताना..
सामाजिक उपक्रमात सहभागी..
मुंबई उच्च न्यायालयात..
जयंती कार्यक्रमांत सहभागी..
पियाजो शोरुमवर ग्राहकांसोबत..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading