श्रीगोंदा.. महिलेवर अत्याचार.. छातीवर, मांडीवर धारदार वस्तूने वार करीत त्या पिडीतेवर बलात्कार..!

दिनांक ३ जुन २०२४, श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहराच्या जवळ पाच किमी अंतरावर असणाऱ्या गावात दिनांक २ जुन २०२४ रोजी सायंकाळी ७:०० वाजनेच्या दरम्यान फिर्यादी/घटनेतील पीडिता ही त्यांचे शेतामध्ये एकटी भुईमुगाचे शेंगा काढत असताना, भाऊसाहेब उत्तम दांगडे याने त्याचे विरुद्ध त्या महिलेने मागील ३ वर्षापुर्वी दिलेली केस कोर्टात दिनांक १५ मे २०२४ रोजी मिटवुन का घेतली नाही .? म्हणत, तु जर केस मिटवुन घेतली नाही..! तर, तुला व तुझ्या दोन्ही मुलांना जिवे ठार मारीन .? 

तुझ्या घरात दिवा लावायला माणुस ठेवणार नाही. अशी धमकी देवुन, भाऊसाहेब दांगडे याने फिर्यादीचे छातीत, पोटात, कमरेला लाथाबुक्यांनी मारहाण करुन, धारधार वस्तुने त्या महिलेच्या डाव्या पायाच्या मांडीवर व डावे छातीवर मारुन जखमी केले. 

यातील महिलेने आरडा ओरड केल्याने तिचे तोंड दाबुन फिर्यादीचे अंगावरील ब्लाऊज, साडी फाडुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरीक संभोग केला. याप्रकरणी फिर्यादिने दिलेल्या तक्रारीनुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भा.दं.वि.क. ३७६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संपत कन्हेरे  करीत आहेत.

स्रोत:(फिर्याद)

Leave a Reply