जीवा घोडके वर “सांगवी दुमाला अत्याचार “प्रकरणी,खंडणीचा गुन्हा दाखल..

दिनांक ५ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला येथे गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या मागासवर्गीय तरुणीच्या अत्याचार घटनेच्या अनुषंगाने,पीडित मुलीच्या वतीने आरोपींच्या विरोधात ३७६ ३०७ ३५४ सह ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल करण्यापूर्वी,पीडितेने तिच्याबरोबर झालेल्या अन्यायाची सर्व कहाणी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती.त्या अनुषंगाने पुण्यातील सणसवाडी व नाशिक येथील काही कार्यकर्ते या मुलीच्या मदतीसाठी श्रीगोंद्या पर्यंत आले होते.पोलिस प्रशासनावर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात त्यांनी दबावतंत्र वापरल्याचे समजते,यानंतर,पीडितेच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल करतेवेळी जीवा घोडके हाही याप्रकरणी पोलीस स्टेशनला हजर होता.तसेच, इतर काही चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.मात्र,नमूद प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेत.त्यांनी या विषयातून पळ काढला .
दिनांक १० सप्टेंबर १९ रोजी या प्रकरणातील आरोपिने श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार अर्ज दिलेला आहे की,पिडीतेच्या फिर्यादीवरून आरोपी लखन काकडे,लक्ष्मण नलगे,सुधीर नलगे,कुमार काकडे सह तीन महिला आरोपीच्या विरोधात ३७६,३०७, ३५४ नुसार गुन्हा दाखल आहे.सदर गुन्ह्यात आरोपी लखन काकडे हा मॅजिस्ट्रेट कस्टडीत असून,एका महिलेचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.तसेच,इतर आरोपी फरार आहेत.
दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजता जीवा भानुदास घोडके राहणार सिद्धार्थनगर,श्रीगोंदा याने तक्रारदार यांचे नातेवाईक जठार वकील यांना त्यांच्या कार्यालयात भेटून,नलगेची केस मागे घेण्याची व त्या फिर्यादी मुलीची जबाबदारी घेतो.असे म्हणून,मुलीची आहे ती केस मागे घेण्याकरता ३० लाख रुपये द्या. सर्व पत्रकारांसमोर कुटुंबाने तिची माफी मागावी.ती मुलगी म्हणेल तेथे लिहून द्यायला तयार आहे.हे मान्य केले नाही.तर,जीवा व काही पदाधिकारी हे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण बसणार असून,त्यांनी सदर खंडणी मागणी केल्याचे संभाषण सी.सी.टी.व्ही.मध्ये रेकॉर्ड झालेले आहे.त्याचे फुटेज फिर्यादीने अर्जासोबत सादर केले असल्याचे पोलिसांनी माध्यमांना काळविले आहे.
श्रीगोंदा पोलिसांनी हा अर्ज खरा असल्याची खात्री करण्यासाठी,सरकारी पंचासमक्ष सदर फुटेज मधील संभाषणाची स्क्रिप्ट तयार करून,ऐकले असता,तक्रारीमध्ये खंडणी मागितल्याची प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे स्पष्ट होत आहे.असे,पोलिसांचे म्हणणे आहे. याविषयी तक्रारदाराची फिर्याद नोंदवून गुन्हा रजिस्टर नंबर ९३९/ २०१९ भा.द.वि.कलम ३८४, ३८५, ५०६ प्रमाणे जीवा भानुदास घोडक,सिद्धार्थनगर,श्रीगोंदा याच्या विरुद्ध खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲट्रॉसिटी चे खोटे गुन्हे दाखल करीत,लोकांची आर्थिक पिळवणूक करने,चळवळीचे नाव घेऊन,पैसे व खंडणी उकळणारी टोळी ,श्रीगोंदा शहरासह तालुक्यात सक्रीय असल्याचे या प्रकरणाने समोर येत आहे.अश्या कार्यकर्त्यांच्या अज्ञानपणामुळे,कायदाहि कुचकामी होत चालला असल्याचे निदर्शनास येत आहे. अज्ञानी कार्यकर्त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे पिडीतहि वस्तुस्थिती पासून दूर लोटला जात असून,न्यायापासूनहि दुरावला जात आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading