शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनची रौप्य मोहत्सवी गडकिल्ले ट्रेकिंग मोहीम गड स्वच्छतेने संपन्न..

दिनांक ६ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन या महाराष्ट्रातील गडकिल्ले ट्रेकिंग अभ्यास व निसर्ग भटकंती करणाऱ्या ग्रुपची नुकतीच,रौप्य मोहत्सवी २५ वी ट्रेकिंग मोहीम जागतिक कीर्तीचे कास पठार व छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगड येथे गेली होती. या मोहिमेत एकूण ८७ मावळ्यांचा सहभाग होता. यामध्ये शालेय विद्यार्थी,कॉलेज तरुण,तरुणी,लहान मुले, महिला यांचा सहभाग लक्षणीय होता. म.गांधीची १५० वी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती यानिमित्ताने साजरी करण्यात आली.
यावेळी गडावर पडलेला कचरा,कागद,प्लास्टिक इत्यादी गोळा करून कचराकुंडीत टाकण्यात आला. गडावर कचराकुंडी आहे.तरीही कचरा इतस्ततः विखुरलेल्या अवस्थेत होता.त्यामुळे गडाचे सौंदर्य कमी होते.म्हणून,तो कचरा गोळा केला. तेथेच असलेल्या कचराकुंडीत जमा केला.याकामी संकेत नलगे,विठ्ठल मासाळ,अविष्कार इंगळे,आर्यन खलाटे,संदीप खलाटे,वृषाली वेठेकर,संगीता इंगळे,राजेश इंगळे,कपिल उल्हारे यांसह अनेक मावळ्यांनी सहभाग घेतला.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनची गडकिल्ले अभ्यास मोहिम प्रथमच,महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी.बसने नेण्यात आली होती.या मोहिमेत महिलां व मुलींचा लक्षणीय सहभाग होता.यामध्ये छत्रपती शिवरायांची ललकारी गारद,जोशपूर्ण गडदुर्ग वारी,गडपूजन,गडफेरी,संपूर्ण किल्ला दर्शन व निसर्ग विहंगम दृश्य अनुभले.जागतिक कीर्तीचे कास पठारावरील फुलांची मोहक दुनिया पाहण्यास मिळाली.वेगवेगळ्या आकाराची रंगांची,वेगवेगळी फुले डोळ्याचे पारणे फेडून गेली.
या मोहीमेत प्रमोद शिर्के,संदीप खलाटे,संकेत नलगे,संतोष पवार,विठ्ठल ढाणे,सुधीर ढवळे,जालिंदर पाडळे, संगीता इंगळे,वैशाली परहर,कविता खराडे,मंगल खराडे,पुष्पांजली शिर्के,संजय वेठेकर,अजित दळवी,विठ्ठल मासाळ,रामदास भापकर,दिगंबर भुजबळ,दिलीप घोडके,बाळू जासूद,प्रवीण भोसले,शिवकुमार गोसावी,संदीप लोंढे,बबन सावंत,संभाजी मगर,ज्ञानदेव रायकर,मारुती साळवे,गिरीश गायकवाड सहभागी होते.



