वर्षावास मालिकेतील चौदावा धम्म देसना कार्यक्रम,श्रीगोंदा येथे संपन्न..
दिनांक ७ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
६ ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आयु.प्रशांत चव्हाण सर यांच्या निवासस्थानी वर्षावास मालिकेतील चौदावा धम्म देसना कार्यक्रम संपन्न झाला.
बुद्ध वंदेनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आयु. सतीश ओहळ सर यांनी केले. आयु. अविनाश घोडके यांनी धम्माच्या प्रचारात येणाऱ्या अडचणी व त्या वरील उपाय योजना या विषयक मार्गदर्शन केले.आयु. प्रशांत चव्हाण सर यांनी ब्रम्ह विहार या विषयावर माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पेडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आयु.दिलीप घोडके यांनी भूषवले.अध्यक्षीय मनोगतात घोडकेनी व्यसनाधीनते बद्दल जागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चव्हाण सरांनी मानले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा श्रीगोंदा तालुका कोषाध्यक्ष आयु.राजू ओहळ,कार्यकारिणी सदस्य आयु.संजय ओहळ,आयु.उबाळे सर,जनता विद्यालय,काष्टीचे प्राध्यापक आयु.यादव सर,आयु. रावसाहेब घोडके,आयु.मयूर व अक्षय घोडके व इतर अनेक कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.