५ उमेदवारी अर्ज मागे,निवडणूक रिंगणात ११ उमेदवार…

दिनांक ७ ऑक्टोबर श्रीगोंदा:
२२६ श्रीगोंदा मतदार संघासाठी वैध झालेल्या उमेदवारी अर्जांपैकी आज दिनांक ७ ऑक्टोबर रोजी ५ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले आहेत.यामुळे, निवडणुक रिंगणामध्ये ११ उमेदवार असणार आहेत.
अनुराधा राजेंद्र नागवडे,दादा श्रीपती शिरवाळे,प्रवीण मोहनराव मांडे,अण्णासाहेब सिताराम शेलार आणि नंदू श्रावण ससाने या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी मागे घेतले आहेत.
घनश्याम प्रतापराव शेलार पक्ष (नॅशनलिस्ट काँग्रेस) चिन्ह(घड्याळ),पाचपुते बबनराव भिकाजी पक्ष (भारतीय जनता पार्टी)चिन्ह(कमळ),सुनिल लक्ष्मण ओहोळ पक्ष(बहुजन समाज पार्टी) चिन्ह(हत्ती),जठार बाळू आप्पा पक्ष(पिझंट्स अँड वर्कर पार्टी ऑफ इंडिया)चिन्ह(खटारा),टिळक गोपीचंद भोस पक्ष(संभाजी ब्रिगेड)चिन्ह(शिवण यंत्र),तात्याराम बलभीम घोडके पक्ष(बहुजन मुक्ती पार्टी) चिन्ह (खाट),मच्छिंद्र पांडुरंग सुपेकर पक्ष(वंचित बहुजन आघाडी)चिन्ह(गॅस सिलेंडर)प्रमोद बाजीराव काळे(अपक्ष)चिन्ह(बॅट),राजेंद्र निळकंठ नागवडे (अपक्ष)चिन्ह(प्रेशर कुकर),सुनील शिवाजी उदमले (अपक्ष)चिन्ह(चावी)आणि हरिश्चंद्र पाटीलबुवा पाचपुते(अपक्ष)चिन्ह(शीट्टी)असे निवडणूक रिंगणात निवडणूक लढविनाऱ्या उमेदवारांची नावे आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading