महादजी शिंदे विद्यालयात,मतदार जनजागृती सप्ताह उत्साहात…

दिनांक १३ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील महादजी शिंदे विद्यालयामध्ये,मतदार जनजागृती सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यालयामधुन श्रीगोंदा शहरामध्ये मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विद्यार्थ्यांनी ‘मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो’, ‘सुजान मतदार लोकशाहीचा आधार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीचे आयोजन विक्रम वाघ, बापू जाधव,अजय गाडेकर,संदीप कोळपे,शिवाजी थिटे यांनी केले होते.कलाशिक्षक संतोष शिंदे व कल्पना जाधव यांनी बनवलेले जनजागृतीपर फलक मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच विद्यालयातील माध्यमिक विभागातील नववी, दहावी व जुनिअर विभागातील अकरावी,बारावीच्या विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धांमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
मतदार जनजागृती सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले.तसेच,आपले आई-वडील शेजारी व परिसरातील मधील नागरिकांमध्ये मतदान संदर्भात जनजागृती करण्याची शपथ देण्यात आली. ‘आधुनिक भारतामध्ये लोकशाही राज्यात राजा राणीच्या पोटी जन्माला येत नसून,राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो’.म्हणून,मतदाराने प्रलोभनांना बळी न पडता जागृतपणे मतदान केले पाहिजे.तरच, देशाचा व समाजाचा उत्कर्ष होईल.असे प्रतिपादन मतदार जनजागृती सप्ताहामध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानामध्ये,सचिन झगडे सर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयाचे(प्राचार्य)तुकाराम कन्हेरकर, (उपप्राचार्य)बाळासाहेब जाधव,(पर्यवेक्षक)उत्तम बुधवंत,विलास दरेकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading