मानवाला धुरंधर करण्याची ताकत फक्त धम्मातच: धोंडिबा घोडके.

दिनांक १४ ऑक्टोबर,लिंपनगाव,श्रीगोंदा:
भारतीय बौद्ध महसभा श्रीगोंदा तालुका शाखेच्या वतीने आयोजीत वर्षावास समारोह कार्यक्रम लिंपनगाव तालुका श्रीगोंदा येथे संपन्न झाला.
यावेळी,अध्यक्षपदावरून बोलतांना धोंडीबा घोडके यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले भगवान गौतम बुद्धांने सारनाथ येथे पंचवर्गीय भिकुना उपदेश केला.त्यांच पाच भिकुंनी बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केला. सम्राट अशोकाच्या काळात राजाश्रय मिळाल्यामुळे जगात ८४ हजार विहार निर्माण झाली.आता राजाश्रय मिळत नसल्यामुळे धम्म प्रचारात अडचण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बुद्ध वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.भारतीय बौद्ध महासभेचे(जिल्हा सचिव)आयु.सतीश ओहोळ (सर) यांनी प्रस्ताविक केले.भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष आयु.गोरक्ष ओहोळ(सर) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान (तालुकाध्यक्ष)आयु.प्रशांत चव्हाण(सर) यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका(कोषाध्यक्ष)आयु.राजू ओहोळ यांनी केले.तर, आभार आयु.महादेव ओहोळ यांनी मानले.यावेळी, भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस आयु.पंडित कांबळे,कार्यकारिणीत सदस्य आयु. राष्ट्रभूषण घोडके, भारत आल्हाट इत्यादि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ ओहोळ,सुहास ओहोळ,लक्ष्मण सुडगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading