मतभेद व मनभेद झुगारून नागवडे,पाचपुते एकत्र येणे समाज हिताचे मौलिक उदाहरण: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी…
बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ स्मृती इराणींची जाहीर सभा संपन्न..
दिनांक १५ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
आज रोजी दुपारी शेख महमंद बाबांच्या प्रांगणात बबनराव पाचपुते यांच्या प्रचाराची जाहीर सभा पार पडली.यासाठी,केंद्रीय वस्त्रोद्योग व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी या मुख्य वक्त्या होत्या. त्यांनी या सभेच्या माध्यमांतून भाजपा आणि भारत सरकारच्या विविध योजनांची माहिती नमूद केली. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या कि,मतभेद आणि मनभेद झुगारून,जनतेच्या हितासाठी नागवडे,पाचपुते एकत्र आले.त्यांचे मी स्वागत करते.आपले राजकारण टिकवत,श्रीगोंदा कार्यक्षेत्रातील जनतेच्या हितासाठी, एकत्र येणे समाज कल्याणाचे एक मौलिक उदाहरण असून,श्रीगोंद्याच्या जनतेतर्फे त्यांचे मी मनापासून स्वागत करते. शासनाच्या विविध योजनाची माहिती देतांना,इराणी यांनी शासन देशातल्या प्रत्येकाला हक्काचे घर देणार असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकाला होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत शासन त्यांच्या मदतीला सदैव पाठीशी राहिले असून,यापुढेही राहणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे भाजप शासनाच्या विरोधात दाखवायला काही नाही.एन.सी.पी. आणि कॉंग्रेस यांच्यात भ्रष्टाचार सोडून दुसरे काही पाहण्यास मिळत नाही.असेही त्या म्हणाल्या आहेत.
शासनाच्या आयुष्यमान योजनेनुसार देशातील १० करोड नागरिकांना १३ – शे आजारात पाच लाखांपर्यंत विनाशुल्क उपचार करण्यात येणार आहेत.त्यानुसार, आजच्या तारखेला ५० लाख लोकांचा उपचार या योजनेतून करण्यात आलेला आहे.मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २० लाख लोकांना आजारात मदत करण्यात आली असल्याचे इराणी यांनी नमूद केले. हि निवडणूक सामान्य माणसांची आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या माध्यमातून उज्वल भविष्य निर्माण होणार असून,आपण सर्वांनी भाजपच्या बबनराव पाचपुतेंना निवडून द्या.ते तुमचे भविष्य बदलून टाकतील असे,केंदीय मंत्री स्मृती इराणी यांनी या सभेतून जाहीर केले आहे.
यावेळी सभेचे अध्यक्ष डॉ.सुजय विखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्यांनी श्रीगोंद्याच्या राजकारणात अर्थकारण आणि राजकारण जोपर्यंत वेगळे होत नाही.तोपर्यंत,श्रीगोंदा वाशियानां हक्काचे पाणी मिळनार नाही.तशेच,येथील युवकांना उज्वल भविष्य पाहायला मिळणार नाही.हे सर्व साध्य करण्यासाठी नागवडे आणि पाचपुते एकत्र आणण्याचा प्रयत्न केल्याचे विखे यांनी सांगितले. जिल्ह्यातील १२ च्या १२ जागेवर विजय मिळवणार असून,शेतकऱ्यानां हक्काचे पाणी मिळऊन देणार असल्याचे त्यांनी विशेषतः नमूद केले आहे.यावेळी,उर्मिला गिरमकर,शक्कुर शेख, AD.कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यासह (आमदार) सुरेश धस,राजेंद्र नागवडे,भगवानराव पाचपुते,बाळासाहेब नहाटा,सुभास डांगे,बाळासाहेब गिरमकर,अनिल ठवाळ,साहेबराव सावंत,जीजाबाप्पू शिंदे,यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.या सभेचे सूत्रसंचालन सतीषशेठ पोखरणा,प्रास्ताविक प्रा.तुकाराम दरेकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन मनोहर पोटे यांनी व्यक्त केले आहे.या सभेसाठी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
मंचावर उपस्थित मान्यवर व पदाधिकारी.
२२६ श्रीगोंदा मतदार संघात निवडणूक प्रक्रिया शेवटच्या चरण मध्ये आहे.आपली भूमिका तळागाळातील सामान्य नागरिकांना समजावी यासाठी सर्वच उमेदवार तयारीला लागलेले आहेत.यासाठी प्रचार प्रक्रिया सुरु असून,जाहीर सभा घेऊन दिग्ग्ज्ज राजकारण्यांकडून पक्ष आणि उमेदवारांची ध्येय धोरणे मांडली जात आहेत.