विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या “सात उमेदवारांना “नोटीसा..
दिनांक १५ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीच्या खर्चाचे बाबत योग्य तपशील देणे गरजेचे असताना,या खर्चाच्या तपशीलात त्रुटी आणि अनियमितता आढळल्याने, सात उमेदवारांना निवडणुक निर्णय अधिकारी श्री.अजय मोरे यांनी नोटीस बजावली असुन,खर्च निरीक्षकांनी ४८ तासात याबाबत खुलासा मागितला आहे.
नऊ उमेदवांरानी आपले खर्च तपशील सादर केले आहेत. मात्र,यात १.श्री. घन:शाम शेलार( राष्ट्रवादी काँग्रेस),२.श्री.बबनराव पाचपुते(भारतीय जनता पार्टी), ३.श्री.बाळु जठार (पीझंटस ॲण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया)४.श्री.मच्छिंद्र सुपेकर(वंचित बहुजन आघाडी), या उमेदवारांच्या निवडणुक खर्चात तफावत आढळल्याने या चार उमेदवांराना नोटीस बजाविण्यात आली आहे. श्री.टिळक भोस(संभाजी ब्रिगेड पार्टी)यांनी तपासणी वेळी प्रमाणके सादर न केल्याने,नोटीस बजाविण्यात आली आहे. श्री. प्रमोद काळे(अपक्ष),श्री.सुनिल ओहळ(बहुजन समाज पार्टी)हे उमेदवांर खर्च तपासणी वेळी गैरहजर असल्याने,यांना नोटीस बजाविण्यात आली आहे.
या बाबतचा खुलासा पुराव्या निशी ४८ तासांत सादर न केल्यास,आयोगाच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.असे नोटीसीत बजावले आहे.उमेदवारांनी निवडणुक खर्च विहीत वेळेत आणि विहीत नमुन्यात सादर करणे बंधनकारक आहे.श्रीगोंदा मतदार संघात ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.व उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची तपासणी करण्यासाठी निवडणुक खर्च निरीक्षक श्री.नागेंद्र दिक्षित काम पाहत आहे.खर्च नियंत्रण कक्षात (सहाय्यक खर्च निरीक्षक)श्री.कनोजीया,(लेखाधिकारी)श्रीमती खेडकर,(सहाय्यक लेखा अधिकारी)श्री.रजपुत,(उप कोषागार अधिकारी)श्री. पुंड,श्री.खुपटे,श्री.कदम,श्री.जगताप,श्री.मोटे,श्री.सातपुते,श्रीमती कंद हे काम पाहत आहेत. पुढील निवडणुक खर्च तपासणी शनिवार ता.१९ /१०/२०१९ रोजी होणार आहे.अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.