श्रीगोंद्यात घनश्याम शेलारांच्या प्रचारार्थ,शरद पवारांची जाहीर सभा संपन्न..

दिनांक १६ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.त्यांच्या विरोधात बबनराव पाचपुते हे भाजपच्या चिन्हावर उभे आहेत.मुख्य लढतीत या दोन उमेदवारांचा समावेश आहे.यांच्या प्रचारासाठी दिग्गज राजकारणी व केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य मैदानात उतरले आहेत.त्यानुसार,काल दिनांक १५ ऑक्टोबर रोजी पाचपुतेंच्या प्रचारासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मुती इराणी आल्या.तर,आज शेलारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार श्रीगोंद्यात आले.पाचपुतेंच्या जाहीर सभेच्या तुलनेत शेलारांच्या सभेला अलोट गर्दी पाहण्यास मिळाली.
यावेळी प्रमुख भाषणातून बोलतांना शरद पवारांनी पाचपुतेंवर टीका केली आहे.ते म्हणाले मी,मुख्यमंत्री असतांना,वनमंत्री हे महत्वाचे खाते माझ्याकडे घेतले होते.कारण वनसंप्पत्ती वाढवणे काळाची गरज आहे.तीच जिम्मेदारी पाचपुतेनां देण्यात आली होती.त्याचबरोबर,आदिवाशी कल्याणासाठी आदिवाशी खातेहि त्यांना देण्यात आले.सुमारे १३ वर्षे पाचपुते यांना मंत्रिपद देऊनही त्यांना काम करता आले नाही. तर अश्यांनी बांगड्या भरल्या पाहिजेत.असे पवारांनी यावेळी भाषणात नमूद केले.नगरला जातांना काष्टीच्या आसपास डाव्या हाताला मोठे बांधकाम दिसते.बांधकाम करा कारखाने काढा.मात्र,दोन वर्ष्यांपासून कामगारांचे थकलेले पैसे आणि शेतकऱ्यांचे बिल तेवढे द्या.कारण घाम गाळून केलेल्या कष्टाचा मोबदला जर दिला नाही.तर,त्याचा तळतळात लागतो. आणि मग कोठेही यश मिळत नाही.
यापुढे राहुल जगताप यांच्याविषयी बोलतांना पवार म्हणाले कि,शेतकऱ्यांची थकलेली बिल द्यायची आहेत.अडचणी आहेत.ते दिल्याशिवाय गत्यंतर नाही.शेतकऱ्यांचे एक महिन्याचे बिल दिले गेले नाही म्हणून,राहुलला झोप येत नाही.अशी भूमिका असणारा व वडिलांची गादी चालवणार हा कर्तुत्वान मुलगा आहे.असे मत त्यांनी नमूद केले .
राष्ट्रवादी सरकारच्या काळात श्रीगोंदा शहराला रस्ते विकासासाठी ३३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.पथ दिव्यांसाठी ५ कोटी रुपये मजूर करण्यात आले.लेंडी नाला शुसोभीकरणासाठी ६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला.त्याचबरोबर नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारती साठी २ कोटी रुपये मंजूर केले.योजना जनतेच्या हितासाठी वापरायच्या असतात,असे संस्कार महारष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यावर केले असल्याचे प्रतिपादन पवार यांनी या जाहीर सभेच्या निमित्ताने केले आहे.शिवाय धन शक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय करण्यासाठी,घनश्याम शेलारांना निवडून देण्याचे आवाहनहि उपस्थितांना केले आहे.
या जाहीर सभेचे अध्यक्ष दादा पाटील शेळके हे होते.सभेचे सूत्रसंचालन स्मितल भैय्या वाबळे यांनी केले.यावेळी राजकुमार लोखंडे,निसार बेपारी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला असून,संभाजी ब्रिगेडच्या अरविंद कापसे यांनी पवार साहेबांना बळीराजाची प्रतिमा भेट देत पाठींबा दिला आहे.
कार्यक्रमात बाबा भोस,राहुल जगताप,घनश्याम शेलार,हरिदास शिर्के,ऋषिकेश गायकवाड,व दीपक भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सोमनाथ धूत,दादा कळमकर सह श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघातील बहुसंख्य कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.कालच्या सभेपेक्षा जास्त लोकसंख्या आजच्या सभेस असल्याची चर्चा येथे होती.

सभेस उपस्थित जनसमुदाय..

Leave a Reply