संभाजी ब्रिगेडच्या नावाचा गैरवापर केल्या प्रकरणी अरविंद कापसे वर गुन्हा दाखल..

दिनांक १६ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात टिळक भोस आणि अरविंद कापसे अशी दोन व्यक्तिमत्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी असल्याचे नमूद आहे.मात्र,टिळक भोस हे पक्ष्याच्या माध्यमांतून श्रीगोंदा – नगर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करीत आहेत.त्यासाठी त्यांनी कंबर कसली असून,तालुक्यातील विविध भागात ते पोहचले आहेत.निवडणूक प्रक्रिया शेवटच्या चरण मध्ये पोहचली असतांना,केंद्रातील नेते मंडळी प्रचार सभा गाजवत कार्यक्षेत्रात येऊन ठेपली आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी जाहीर सभा झाली.त्यात अरविंद कापसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या नावाचा गैरवापर करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला श्रीगोंदा मतदारसंघात पाठींबा दिला असल्याचे समोर येत आहे.
हे सर्व नियोजित असल्याचे संभाजी ब्रिगेडचे उमेदवार टिळक भोस यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना तक्रारी अर्ज करून कापसे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.त्यात भोस यांनी कापसे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी १३ ऑक्टोबर रोजी सामाजिक माध्यमांवर टाकलेले मेसेजेस ज्यात “संभाजी ब्रिगेड श्रीगोंदा,जाहीरपणे आघाडीचे उमेदवार मा.घनश्याम आण्णा शेलार यांच्या सोबत राहून,पवार साहेबांचे स्वप्न पूर्ण करणार.”असा मजकूर नमूद केलेला आहे.
श्रीगोंदा मतदारसंघात संभाजी ब्रिगेडचा उमेदवार उभा असतांना.अश्या प्रकारे संभाजी ब्रिगेडच्या नावाचा गैरवापर करून पाठिंब्याची भाषा नमूद केल्याने.टिळक भोस उमेदवार(संभाजी ब्रिगेड)यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाच्या माध्यमातून,निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी पोलीस (उप अधीक्षक) संजय सातव,(पोलीस निरीक्षक,श्रीगोंदा)दौलतराव जाधव,(गटविकास अधिकारी तथा आचारसंहिता पथक प्रमुख) प्रशांत काळे,सह (एफ.एस.टी.पथक प्रमुख) विलास पवार यांना कारवाईच्या सूचना केल्या.त्यानुसार आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अरविंद कापसे यांच्यावर टिळक भोस यांच्या फिर्यादीवरून भा.द.वि.कलम १७१(ग),५०० व ५०१ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वास्तविक पक्ष्याच्या वरिष्ठांनी बैठकीच्या माध्यमांतून हा निर्णय घेतला असल्याचे,अधिकृत पत्र अरविंद कापसे यांच्याकडे असल्याचे समजते आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading