कॉंग्रेस-राष्ट्रवादी चोर तर भाजप दरोडेखोर: यशपाल भिंगे..

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मच्छिंद्र सुपेकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा संपन्न..

दिनांक १८ ऑक्टोबर,श्रीगोंदा:
श्रीगोंदा शहरातील शेख महमंद बाबांच्या प्रांगणात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मच्छिंद्र सुपेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा दिनांक १७ ऑक्टोबर रोजी संपन्न झाली.सभेसाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.यावेळी विचारमंचावर संतोष जौंजाळ,सुरेश चव्हाण,राहुल सुपेकर,जालिंदर, घोडके,अनिल भुजबळ,गौतम घोडके,कांतीलाल कोकाटे,दादासाहेब पाडळे,(उमेदवार)मच्छिंद्र सुपेकर सह कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर यशपाल भिंगे व अण्णाराव पाटील उपस्थित होते.
यासभेत आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना यशपाल भिंगे म्हणाले कि,सामन्य जनतेने अनेक कालखंड सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला नाकारुन भाजपला स्वीकारले. मात्र,गेल्या पाच वर्ष्यांच्या कारकिर्दीत भाजपाने काय केले? कॉंग्रेस राष्ट्रवादी चोर निघाले तर भाजपा दरोडेखोर. सामन्यांची पूर्ण दिशाभूल केली गेली असल्याची टीका भिंगे यांनी येथे केली.पुढे बोलतांना ते म्हणाले कि,भाजपच्या काळात झालेला नोटबंदी हा देशातला सर्वात मोठा घोटाळा होता.शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे कामं हे सत्ताधारी करीत आहेत.शेतकऱ्यांचे वंशज म्हणून ज्यांना सामान्यांनी सत्तेत पाठवल.त्यांनी सामान्य शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली.”मोदि है तो मुनकीन है” अस ते म्हणतात.पण,त्याच्या पुढे आम्ही आणखी एक वाक्य जोडलयं “मोदी है तो मुनकीन है,क्योंकी उनके पास इव्हीम है”.राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस आणि भाजप,सेनेच्या उमेदवारांनी आजपर्यंत सत्तेसाठी इतक्या कोलांट्या उड्या मारल्यात कि,आत्ता आपण कोण्यात्या पक्षात आहोत हे पोस्टर वर पाहून त्यांना निश्चित करावे लागत आहे. इतकी दलबदलू वृत्तीचे पुढारी राजकारणात सक्रीय आहेत.लोकशाही व्यवस्था त्यावेळी मजबूत असते,ज्यावेळी सत्ताधाऱ्याला धाऱ्यावर धरणारा विरोधी पक्ष अस्तित्वात असतो. भाजपला विरोधी पक्षच नको आहे.भाजपचे मुख्यमंत्री जाहीर सभेत म्हणतात कि,आम्हाला विरोध करणारा पक्ष आणि माणसे राहिलेली नाहीत.यामुळे लोकशाही जर मजबूत करायची असेल.तर,लोकशक्ती मजबूत करावी लागेल.यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या.असे,आवाहन भिंगे यांनी यावेळी या जाहीर सभेच्या निमित्ताने केले.शिवाय उदय प्रकाश यांच्या कवितेतील पंक्ती त्यांनी नमूद केल्या.”आदमी मरनेके बाद कुछ नही बोलता. आदमी मरनेके बाद कुछ नही सोचता. कुछ नही बोलणे और कुछ नही सोचनेपर आदमी मर जाता है.”
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे(उमेदवार)मच्छिंद्र सुपेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.श्रीगोंदा वाशियांनी जर मला निवडून दिले.तर,यापुढे आयुष्यभर मी त्यांची सेवा करील. समाजसेवा हाच माझा पुढील आयुष्याचा भाग असेल.श्रीगोंदा तालुक्यात अतिशय गलीछ राजकारण चालू असून,समाजकारण म्हणून मी हे काम हाती घेतले असल्याचे,सुपेकर यांनी यावेळी नमूद केले.
या सभेचे सूत्रसंचालन कांतीलाल कोकाटे यांनी केले.तर,आभार सुरेश चव्हाण यांनी मानले.

उपस्थित जनसमुदाय व कार्यकर्ते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading