टिळक भोस यांच्यावर कारवाई करीत,उमेदवारी रद्द करा: अरविंद कापसे..
दिनांक १९ ऑक्टोबर श्रीगोंदा:
संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या नावाचा गैरवापर वापर करीत,टिळक भोस हे २२६ श्रीगोंदा मतदार संघात निवडणूक लढवित आहेत.”संभाजी ब्रिगेड पार्टी”या नावाने राजकीय भूमिकेचा उल्लेख करीत,निवडणूक लढवणे गरजेच्या असतांना. “संभाजी ब्रिगेड-मराठा सेवा संघ” या सामाजिक संघटनेच्या नावाचा वापर करून टिळक भोस निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
संघटना प्रमुख प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली,श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आघाडीचे उमेदवार घनश्याम आण्णा शेलार यांना संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ या सामाजिक संघटना राजकीय पाठिंबा देणार असल्याचे,अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले असल्याची माहिती (तालुकाध्यक्ष)अरविंद कापसे यांनी माध्यमांना दिली आहे.टिळक भोस यांनी संघटनेच्या नावाचा गैरवापर केल्याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.याविषयी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी,पोलीस उपअधीक्षक,तहसीलदार श्रीगोंदा,पोलीस निरीक्षक श्रीगोंदा,यांना कारवाईचे पत्र सादर करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये संभाजी ब्रिगेड,मराठा सेवा संघ या सामाजिक संघटनेचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष अरविंद कापसे यांनी नमूद केले आहे की,संभाजी ब्रिगेड संघटना ही प्रवीण दादा गायकवाड यांच्या नावाने धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये टिळक भोस हे संभाजी ब्रिगेड पार्टीचे उमेदवार आहेत .परंतु, प्रचारादरम्यान ते व त्यांचे सर्व साथीदार कुठेही”संभाजी ब्रिगेड पार्टी”असा उल्लेख करीत नाहीत.म्हणून,मूळची प्रविणदादा गायकवाड यांच्या नावाने कार्यरत असलेल्या,संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटने विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतभेद व संभ्रम निर्माण होत आहेत.यातून संघटनेची बदनामी होत आहे.दिनांक १२ ऑक्टोबर २०१९ रोजी उपाध्यक्ष तथा मुख्य समन्वयक मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र यांचे पत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, संघटनेचे(प्रदेशाध्यक्ष) प्रवीणदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची जेजुरी येथे बैठक झाली.तेथे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कापसे यांनी सांगितले आहे.
टिळक भोस हे जाणीवपूर्वक मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेची राजकीय हेतूने बदनामी करत असून,उमेदवार टिळक भोस यांच्यासह युवराज पळसकर,युवराज चिखलठाने,दिलीप लबडे,राजेंद्र राऊत,गोरख उंडे हे या सर्व कटात सामील आहेत.यांच्या निवडणूक प्रचारातील संभाजी ब्रिगेड या शब्दावर आमचा आक्षेप असल्याने वरील सर्व व्यक्तींवर माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हे दाखल करावेत.तसेच,उमेदवार टिळक भोस यांची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात यावी.या कारवाई विषयीचे पत्र मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी भारत सरकार यांना अरविंद कापसे यांनी दिले आहे.