संविधानामुळे भारत एकसंघ : शिंदे एस.टी.

दिनांक २७ नोव्हेंबर,शिंदे,(कर्जत):
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमातुन तयार केलेल्या भारतीय संविधानामुळेच भारत देश अनेक अडचणीत ही एकसंघ आहे.असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक श्री.शिंदे एस.टी.यांनी केले.
न्यू.इंग्लीश स्कूल शिंदे ता.कर्जत या विद्यालयात भारतीय संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्य,समता ,बंधुता व न्याय, दिल्यामुळेच अनेक जाती धर्माचे लोक आज भारत देशात आनंदाने नांदत आहेत.बाबासाहेबांनी संविधानामध्ये जात,धर्म,पंत, लिंग असा भेदभाव न करता समानता निर्माण केल्याचे ही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर व संविधान प्रतिमेचे पुजन करून झाली.यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थांनी संविधान दिन या विषयी मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री.शिंदे एस.टी.सर यांनी विद्यालयास संविधानाची प्रत सप्रेम भेट दिली. यावेळी मंचावर मुख्याध्यापक श्री.गोसावी सर,श्री. ओहोळ सर श्री.माने सर,थोरात सर,श्री.पोकळे सर,श्री.मखरे सर इ.शिक्षक व शिक्षकेतर बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिंदे सर यांनी तर सुत्रसंचालन सुपेकर सर यांनी केले.आभार श्री.सोलंकर सर यांनी मांनले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading