दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या वतीने भारतीय संविधान दिन साजरा…

दिनांक २७ नोव्हेंबर,श्रीगोंदा:
दक्ष नागरिक फाऊंडेशनच्यावतीने जोधपुर मारुती चौकात,”भारतीय संविधान दिन”उत्साहात साजरा करण्यात आला.
दक्षचे अध्यक्ष यांनी यावेळी प्रास्ताविकात बोलतांना सांगितले की,भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे.भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला. जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारतात राज्यघटना अंमलात आली.
मुख्य विषय मांडताना अविनाश घोडके म्हणाले की, देव दानव या संकल्पनेत भारतासह विश्वात मनुष्य हा सर्व व्यवस्थांमध्ये वंचित राहिला होता.परंतु,मनुष्य असेल तरच मनुष्याचे दृष्टीने बाकी सर्वांना महत्त्व आहे.मनुष्याला न्याय मिळण्यासाठी संविधान लिहिताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुष्य केंद्र स्थानी ठेवून संविधान लिहिले.हे संविधान यशस्वी ठरले आहे.
अॅड.संग्राम देशमुख म्हणाले की, प्रत्येक देशाची घटना वेगवेगळी असुन,त्यावर त्या त्या विचारांचा पगडा आहे .परंतु,आपली राज्यघटना सर्वच देशांना दिशा देणारी आहे. प्रत्येकाला घटनेने स्वातंत्र दिलेले आहे. आपली लोकशाही पुर्णपणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरां नी लिहिलेल्या संविधानावरच अाधारित आहे.
याप्रसंगी सुभाष कांबळे यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करण्यात आला.पवित्र संविधानाचे पुजन दत्ताजी जगताप यांनी केले.यावेळी दक्षचे जेष्ठ संचालक श्रीरंग साळवे, अॅड.संग्राम देशमुख, अविनाश घोडके, सुभाष कांबळे, द्यानराज भालेराव, डॉ.कांडेकर, संजय सप्रे, राहूल बोरुडे, विलास घुटे, पोलीस कॉन्स्टेबल वैराळ, सुरेंद्र शिंदे, भाऊसाहेब दांगडे, भाऊ साळुंके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व संविधानाचे पुजन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading