शेतकरी संघटनेच्या निर्बंधमुक्ती आंदोलनास,शंभुसेना संघटनेचा पाठींबा.

दिनांक १०डिसेंबर,(पेडगाव,श्रीगोंदा):
शेतकरी संघटनेच्या वतीने अखंड महाराष्ट्रभर पुकारलेल्या, दिनांक १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या , शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भातील निर्बंधमुक्ती आंदोलनास शंभुसेना प्रमुख,(अध्यक्ष)दिपकराजे शिर्के यांनी परिपत्रक काढून शंभुसेना सामाजिक संघटनेचा जाहिर पाठिंबा दर्शिवला आहे.
दिनांक १२ डिसेंबर १९ रोजी’एकाच दिवशी..एकाच वेळी’..अवघ्या महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी होणाऱ्या व शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्वाच्या विविध मागण्या संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने निर्बंधमुक्ती आंदोलनास शंभुसेना संघटनेने जाहिर पाठींबा देऊन आंदोलनात सहभागी होण्यासंदर्भात नुकतेच शेतकरी संघटनेचे जेष्ठ राष्ट्रीय नेते,(प्रदेश अध्यक्ष) अनिल घनवट यांनी विनंती पत्र दिले होते. याप्रसंगी ,स्वतंत्र भारत पक्षाचे (जिल्हा अध्यक्ष) विक्रमराव शेळके यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
त्यादृष्टीने शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला, शंभुसेना संघटनेने “बळीराजा बचाव अभियाना” अंतर्गत नुकतेच शिर्के यांनी घनवट यांना पाठींबा पत्र देऊन,समर्थन दर्शिवत शंभुसेना पदा- धिकारी, शंभुभक्त व शंभुसैनिकांनी लोकशाही , सनदशीर व शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभागी होत,शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनापुढे मांडाव्यात असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading