खोटा दस्तावेज सादर करीत,फसवणूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल..
दिनांक १० डिसेंबर,श्रीगोंदा:
तालुक्यातील कोथूळ येथील तीन जणांनी दिनांक ९ डिसेंबर रोजी,पुण्यातील रहिवासी मीना किशोर पासलकर यांच्या नावे बनावट आधार कार्ड बनवून,ते पुरावा म्हणून सादर करीत, दुय्यम निबंधक कार्यालय,श्रीगोंदा येथे संगनमताने फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीगोंद्यातील दुय्यम निबंधक कार्यालय येथे यापूर्वी असे अनेक प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले असून,असे बनावट खरेदीचे प्रकार नवीन नाहीत.
असाच हा प्रकार दिनांक ९ डिसेंबर रोजी ११:०० वाजता नमूद कार्यालयात घडला.श्रीगोंदा तालुक्या तील कोथूळ येथील रहिवाशी आशा गोरख लगड,राजाराम गोपीनाथ भोसले व गोरख तुकाराम लगड यांनी वानवडी,पुने येथील रहिवासी मीनाक्षी पासलकर यांच्या नावे बनावट आधार कार्ड बनवून.तो पुरावा म्हणून, सादर करून खोटा दस्त ऐवज लिहून दिला.तसेच देणार व घेणार यांना ओळखणारे आपापसात संगणमत करून,जाली दस्तावेज तयार करीत नमूद फिर्यादी व शासनाची फसवणूक केली.
फिर्यादी मीना किशोर पासलकर यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये नमूद तीन आरोपीं विरोधात भादवि कलम ४२०,४६८,४७१ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि पाटील करीत आहेत.
तालुक्यातील विविध शासकीय कार्याल्याप्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये वाढत्या दलालांच्या हस्तक्षेपा मुळे,अशाप्रकारे चुकीचे दस्तावेज,जाली कागदपत्र सादर करीत कमी पैशात काम करण्याच्या उद्देशाने शासकीय कामातील विश्वासार्हता संपत चालली असल्याचे निदर्शनात येत आहे.