श्रीगोंदा नगरपालिकेत’आंधळ दळतंय अन कुत्र पिठ खातयं”!अशी अवस्था:गोरख आळेकर..

रस्त्याच्या कामात मुरमा ऐवजी मातीचा वापर.

दिनांक ९ डिसेंबर,श्रीगोंदा:
मानव सेवा कन्सल्टंट धुळे या संस्थेची नेमणूक नक्की रस्ते दर्जेदार व्हावे म्हणुन केली.की? रस्ते निकृष्ठ करावे म्हणून केली? याचा खुलासा नगर पालिकेने करून,संबधीत संस्थेवर कायदेशीर कारवाई करावी.. गोरख आळेकर..
श्रीगोंदा शहरात गेली दोन वर्षे झाले,नगरोत्थान योजनेतून ३३ कोटी रुपये खर्चून रस्त्यांचे कामकाज चालु आहे.या कामात अनेक वेळा नैसर्गिक अडथळा व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम बंद पडले.प्रदिर्घ विश्रांती नंतर रस्त्याच्या कामाला वेग आला.पण,डब्लु.बी.एम.च्या कामावर मुरूमा ऐवजी चक्क माती टाकली जात आहे.
नमूद कामांवर नगर पालिकेच्या स्थापत्य अभियंत्यांनी लक्ष देयाला हवे, पण ते येथे फिरकतही नाहीत.या कामावर’मानव सेवा कन्सल्टंट धुळे’ यांची कन्सल्टंट म्हणुन नियुक्ती केली आहे.या बदल्यात त्यांना कोट्यावधी रुपये देण्यात आले आहेत.तरी पण’मानव सेवा कन्सलटंट’चे इंजिनीअर रस्त्याच्या कामावर लक्ष देत नाहीत. ठेकेदार निकृष्ठ काम करत आसतांनाही हे ठेकेदारास काही अटकाव करीत नाहीत.
श्रीगोंदा नगर पालिकेला कित्येक दिवसांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाहीत.नगर पालिकेत “आंधळ दळतंय अन कुत्र पिठ खातयं”अशी अवस्था झाली आहे. विरोधक सत्ताधार्यांबरोबर हात मिळवणी करत आहे.शहरातील कामे दर्जेदार होत नसतील ? तर, विकासाच्या नावाखाली शहरात चालु असलेले कामे ताबडतोब बंद करा.नाहीतर जन आंदोलन करण्यात येईल. असे अस्तित्व फाऊंडेशन चे अध्यक्ष गोरख आळेकर यांनी माध्यमांना सांगितले आहे

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading