“प्रधानमंत्री सन्मान निधी” योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांना आवाहन..

दिनांक १० जानेवारी,श्रीगोंदा:
PM Kisan योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची आधार नंबर आणि आधार प्रमाणे नाव update करणेसाठी CSC केंद्रानां  १० रुपये शुल्क आकारून,सदरचे कामकाज करण्याच्या सूचना सर्व CSC चालकांना देण्यात आल्या आहेत.
संबधित शेतकऱ्यानी जवळच्या csc केंद्रात जाऊन किंवा आपले तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक यांना संपर्क करून ,आपला आधार नंबर pmkisan.gov.in या वेबसाईटवर update करायचा आहे.तसेच,तहसील कार्यालय श्रीगोंदा,येथे पंतप्रधान सन्मान निधी योजना तक्रार निवारण कक्ष देखील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी स्थापन केलेला आहे.आधार नंबर आणि आधार प्रमाणे नाव जर update केले नाही.तर,त्या शेतकऱ्यांचे पुढील अनुदान बंद होणार आहे.सदरचे कामकाज पूर्ण करावयाच्या सूचना शासनाने निर्गमित केल्या असून, त्यानुसार शक्य तितक्या शीघ्रतेने शेतकऱ्यांनी सदर आधार माहिती सादर करावी.
श्रीगोंदा तालुक्यात pm किसान योजनेसाठी ४३१७५ शेतकरी पात्र असुन,त्यापैकी १७५२५ शेतकऱ्यांनी आधार updation पूर्ण केलेले नाही.त्यामुळे त्यांचे अनुदान बंद होऊ शकते.अशी माहिती श्रीगोंदा तहसील कार्यालया मार्फत प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading