बहुजन समाता पत्रच्या बातमीपत्राचा प्रवास पुन्हा सुरु…

श्रीगोंदा तालुक्यात गेल्या दोन वर्ष्यापूर्वी सुरु करण्यात आलेले,बहुजन समता पत्र या मासिकाच्या  ARTICLE 17 या news Portal ला काही कारणास्तव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र,फुले -शाहू -आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणाऱ्या जाणकार व बुद्धीजीवी व्यक्तींनी news पोर्टल चालू करण्यासाठी आग्रह केला आहे.त्यामुळे दिनांक १० जानेवारी पासून आम्ही  पुन्हा पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
यात काही तांत्रिक बदलाव करीत,आजपर्यंतच्या सर्व प्रक्रियेचे सिंहावलोकन करून,बहुजन समता पत्रचे ARTICLE 17 news पोर्टल चालू करीत आहोत.यात सामाजिक,राजकीय,वैज्ञानिक,ऐतिहासिक,लेख,काव्य,यशोगाथा,कथा,सुविचार,वेगवेगळी चळवळीतील पुस्तके,घटना यांचा विशेषतः समावेश करण्यात येणार आहे.जिल्ह्या सह राज्यातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असून,आपल्या प्रसिद्धीसाठी news portal ARTICLE 17 हमेशा खुले विचारपीठ असणार आहे.
जय भीम,जय भारत……

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading