विद्यार्थ्यांनी कुठल्याही अनैतिक मार्गास बळी पडु नये. पो.निरीक्षक दौलतराव जाधव यांचे प्रतिपादन.
सोनिया गांधी तंत्रनिकेतन येथे पोलिस रेझिंग डे व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त पोलिस निरीक्षकांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.
श्रीगोंदा:शहरातील सोनिया गांधी तंत्रनिकेतन येथे पोलिस रेझिंग डे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवा निमित्त आयोजित “महिला सुरक्षा व जीवन रक्षा” मार्गदर्शन सत्रात पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव बोलताना.
दिनांक ५जानेवारी,श्रीगोंदा:
शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपले करिअर निर्माण करण्याविषयी नेहमी जागरुक राहीले पाहीजे.हे करण्यासाठी त्यांनी आपल्या आई-वडीलांचे कष्ट आठवुन,विद्यार्थी धर्म जोपसण्याची गरज आहे.आयुष्यात चांगले कार्य निर्माण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील रहावे.महिला सुरक्षेचे प्रश्न दिवसेंदिवस वाढले आहेत.महाविद्यालयीन विद्यार्थींनींनी कुठलाही संकोच न बाळगता त्यांच्यावर होणार्या अत्याचाराची कल्पना पोलिस विभागाला तत्काळ ध्यावी.पोलिस विभाग सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच प्रयत्नशील आहे.विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना,कुठल्याही अनैतिक मार्गाचा अवलंब करु नये व त्याच्या बळी पडु नये.असे प्रतिपादन श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी यावेळी केले.
शहरातील सोनिया गांधी तंत्रनिकेतन येथे पोलिस रेझिंग डे व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित “महिला सुरक्षा व जीवन रक्षा” मार्गदर्शन सत्रात जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य अमोल नागवडे यांनी केले.यावेळी कु.मयुरी कांबळे या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले.
पोलिस निरीक्षक जाधव पुढे बोलताना म्हणाले की,विद्यार्थिदशेत गुन्हा दाखल झाल्यास नोकरीसाठी लागणारे ‘ना हरकत प्रमाणपत्रात’ वाईट शेरा दिला जातो.अन् चांगली नोकरी गमवाली जाते.त्यामुळे विद्यार्थिदशेत काळजीपूर्वक वागले पाहिजे.तसेच बालगुन्हेगारी,आजूबाजूला कशा प्रकारे सतर्क राहिल्याने सुरक्षित राहता येते. संकटाच्या वेळी १०० नंबरवर फोन केल्यावर कशा प्रकारे मदतीसाठी पोलीस ताबडतोब हजर होतात.हे सांगून १०० नंबरचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
यावेळी पोलिस हेड काॅन्स्टेबल कोपनर,संस्थेचे निरीक्षक गोलांडे एस.पी, विभागप्रमुख प्रा.पंडीत गायकवाड,प्रा.मंगेश काळे,प्रा.निलेश भोसकर,प्रा.दिनेश शिंदे,प्रा.मनसुक इधाटे,प्रा.प्रविण बाबर,प्रा.विक्रम शिंदे,प्रा.संतोष आळेकर,प्रा.गोरे आर.डी,विद्यार्थी प्रतिनिधी प्रमोद म्हस्के आदी मान्यवर व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा.कानिफनाथ उगले यांनी केले.
