बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी, मुख्यमंत्री व कामगार राज्य मंत्र्यांना निवेदन सादर.

दिनांक ११ जानेवारी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात बरेच बांधकाम कारागीर, मजूर आहेत. तालुक्यातून एक हजाराच्या आसपास कामगारांनी बांधकाम कामगार आयुक्त कार्यालयात आपली नोंदणी केली आहे. उर्वरित कामगारांची लवकरात लवकर सर्वे करून नोंदणी करण्यात यावी.नोंदणी झालेल्या कामगारांना पाच वर्षे नोंदणी लागू आहे.पण,एक वर्षे पूर्ण होताच पुन्हा कागतपत्रे मागवित पुन्हा, नोंदणी करण्यासाठी भाग पाडले जाते.त्यामुळे कामगारांची अवस्था आज घडीला अत्यंत बिकट होत चाललेली आहे.
कामगारांसाठी जे ओळख पत्र दिले आहे.त्यात योजनांची भरमार आहे.मात्र,प्रत्यक्षात कोणत्याही योजनेची अमंलबजावणी होत नाही. तालुक्यात अंदाजे पाच हजार कामगार आहेत. नवीन नोंदणी अथवा इतर सुविधांसाठी श्रीगोंदा येथे शासकीय ऑफिस असावेत. कामगारांना जे सुरक्षा किट दिले होते ते काही कामगारां पर्यन्त पोहोचले नाहीत.ज्यांना मिळाले आहेत त्यांना नगरला जावे लागते.त्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर,त्या व्यक्तीला बराच खर्च करावा लागत आहे. कामगार आजारी किंवा मृत्यू मुखी पडल्यास लवकर मदत मिळावी.बाल कामगार रोखण्यात यावे.सदरील मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रहार संघटना संस्थापक तथा कामगार राज्य मंत्री नामदार बच्चू कडू यांना प्रहार शहरध्यक्ष तथा बांधकाम कामगार अध्यक्ष नितीन रोही,सुरेश गलांडे,अशोक शिंदे, दादा कुदांडे,बाळू दांडेकर,पोपट आळेकर,गोपीनाथ कुदळे,गणेश ससाणे,सोनू रघावंत,शंकर जकताप,सुधीर खेतमाळीस यांनी दिले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading