कोळगाव सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी…

ipc-3536333959352911098709.png
श्रीगोंदा पंचायत समितीच्या माजी उपसभापती च्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचा गुन्हा दाखल…..
दिनांक १७ जानेवारी(कोळगाव,श्रीगोंदा):
खातेदार तसेच त्याची सही अंगठा नसताना बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून,माजी पंचायत समिती उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब भास्कर नलगे यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया,कोळगाव येथील शाखेतील व्यवस्थापक व रोखपाल यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.याविषयीची फिर्याद बँकेचे व्यवस्थापक रोहन उबाळे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात दिली आहे.
ही घटना काल गुरुवार दि.१५ रोजी घडली याबाबत उबाळे यांच्या फिर्यादीवरून प्रताप उर्फ बाळासाहेब नलगे यांच्या विरोधात भादवि कलम३५३ नुसार सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की,दिलेल्या फिर्यादी नुसार श्रीगोंदा पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रताप उर्फ बाळासाहेब भास्कर नलगे हे बबन बाबा मोहरे यांच्या समवेत बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बँकेच्या कोळगाव शाखेत आले. त्यांनी बबन मोहरे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या खात्यातून रुपये ७०० काढण्यासाठी पावती भरून दिली.मात्र,त्यावर खातेदाराचे सही किंवा अंगठा नसल्याने बँकेचे व्यवस्थापक उबाळे यांनी खातेदार समक्ष हवे किंवा आजारी असल्यास तसा वैद्यकीय दाखला द्यावा.किंवा आमच्या कर्मचार्‍याला त्यांची सही घेण्यासाठी प्रत्यक्ष पाठवतो असे म्हंटल.याचा नलगे याला राग आला व त्यांनी उबाळे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत बँक तुझ्या बापाची आहे का? बँकेच्या बाहेर ये तुझ्याकडे पाहतो.असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.यावेळी रोखपाल पोपट सरोदे हे मध्ये पडले असता नलगे याने त्यांनाही शिवीगाळ केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading