इस्रोकडून GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीड वाढणार..
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.दि.१८ जानेवारी पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण यशस्वीपणे करण्यात आले.
दिनांक १९ जनेवारी,नवी दिल्ली:
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.दि.१८ जानेवारी रोजी पहाटे २ वाजून ३५ मिनिटाने दक्षिण अमेरिकेच्या उत्तरपूर्वेकडील कैरो बेटावरून हे प्रक्षेपण करण्यात आले. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे येणाऱ्या काळात इंटरनेटचा स्पीड अधिक गतीने वाढणार आहे.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, जीसॅट-३० हा एक दूरसंचार उपग्रह आहे. हा उपग्रह इनसॅट-४एच्या जागी काम करेल. इनसॅट-४ या उपग्रहाची मर्यादाही संपुष्टात येत असून,तंत्रज्ञानातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अधिक शक्तिशाली आणि आधुनिक उपग्रहाची आवश्यकता होती. त्यामुळेच इस्त्रोने जीसॅट-३० चे यशस्वी उड्डाण केले आहे.