NEET परीक्षा प्रमाणे MHT-CET परीक्षेचे परीक्षा केंद्र बदलण्याची ऑनलाईन पद्धतीने परवानगी द्यावी:अक्षय अनभुले.

दिनांक २७ मे,श्रीगोंदा:

“MHT-CET2020” ची परीक्षा ही लॉकडाऊन आधी १३ ते २३ एप्रिल २०२० या दरम्यान होणार होती. परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा आता जुलै २०२० मध्ये होणार आहे.

या MHT-CET च्या क्रॅश कोर्ससाठी ग्रामीण भागातील बहुतेक विद्यार्थी हे पुणे, लातूर, औरंगाबाद, नगर या सारख्या शहरामध्ये जातात. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्र पुणे, लातूर, औरंगाबाद, नगर या सारखीच शहरेच निवडतात.मात्र,आता क्रॅश कोर्स बंद आहेत आणि विद्यार्थी ही आपआपल्या घरी येऊन घरीच तयारी करीत आहेत. काही विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्हयाच्या ठिकाणी परीक्षेसाठी जावे लागेल.तरी,माझी विनंती आहे कि नीट परीक्षार्थींना ज्याप्रमाणे परीक्षा केंद्र बदलायची परवानगी दिली होती. त्याचप्रमाणे MHT-CET CELL ने अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी द्यावी आणि शक्य झाले तर जिल्ह्या केंद्राबरोबरच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही परीक्षा घेण्यात यावी.यामुळे सोशल डिस्टसिंग चे ही पालन होईल आणि प्रशासनवरील ताणही कमी होईल. अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय अनभुले यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच MHT-CET CELL यांच्याकडे इमेल निवेदनाद्वारे केली आहे.

अशी परवानगी मिळाली आणि मागणी मान्य झाली. तर, नक्कीच राज्यातील CET परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे मत अनभुले यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading