दिनांक २६ मे,(काष्टी,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या ‘परिक्रमा’ शैक्षणिक संकुलातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी कु. कोमल साठे हिने श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसी, औरंगाबाद आयोजित राज्यस्तरीय इ-पोस्टर स्पर्धेत भाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.
तिला प्रा. वैशाली फाळके यांचे मार्गदर्शन मिळाले. कोविड- १९ साथीच्या च्या लॉकडाउन मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा वक्तिमत्व विकास व्हावा,तसेच शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी परिक्रमा सतत प्रयत्नशील असते.
यशस्वी विद्यार्थिनीचे परिक्रमा संकुलाचे सचिव श्री. विक्रमसिंह पाचपुते व संचालक श्री. प्रतापसिंह पाचपुते यांनी अभिनंदन केले.
