रमजान ईदचे औचित्य साधून, प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार..

दिनांक २६ मे,जामखेड:

कोरोनाव्हायरस च्या महामारीत लोकडाऊन च्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवाचे रान करून तसेच, रात्रीचा दिवस करून जबाबदारीने कर्तव्य बजावणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा शहरातील खर्डा ग्रामपंचायत,जामखेड पंचायत समिती,जामखेड पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांचा खर्डा शहरातील रविवार पेठ येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने रमजान ईदचे औचित्य साधून जाहीर सत्कार करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जामखेड पंचायत समितीचे सभापती रविदादा सुरवसे,खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच संजय गोपाळघरे, जामखेड पोलिस स्टेशनचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विजय कोळी, पोलीस कॉन्स्टेबल भागवत जायभाय, पत्रकार संतोष थोरात आदी मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला खर्डा शहरातील रविवार पेठेतील मुस्लिम समाज बांधव राजू भाई शेख, रशीद भाई बागवान,मुनीर भाई बागवान,ग्रामपंचायत सदस्य विकास शिंदे, गणेश डाडर, आसिफ बागवान, सलीम शेख,रफिक भाई शेख, मैनुद्दीन बागवान, कलीम शेख, शोयब बागवान, सुभाष जाधव आदी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देऊन, कोरोना भगाव, देश बचाव चा नारा देण्यात आला.

(वार्तांकन व छायाचित्रे:पत्रकार रिजवान बागवान
खर्डा)

Leave a Reply