दिनांक २५ मे (श्रीगोंदा फॅक्टरी,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यातील ‘श्रीगोंदा फॅक्टरी’ परिसरात घोरपडी या पुण्यातील कोरोना संक्रमित भागातून गावाकडे परतलेल्या एका इसमाचा अहवाल आज पॉझिटीव्ह आल्याने, कारखाना परिसरात खळबळ उडाली आहे. बाहेरून प्रवास करून तालुक्यात येणाऱ्या लोकांमुळे तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण निदर्शनास येऊ लागले आहेत.
सविस्तर माहिती अशी की, दिनांक २२ मे रोजी सदर इसम श्रीगोंदा कारखाना या आपल्या गावी आला. त्याला श्वसना संबंधित त्रास जाणवत होता. म्हणून, तो दिनांक २३ मे रोजी सकाळी काष्टी येथील एका रुग्णालयात तपासण्यासाठी गेला. नमूद डॉक्टरांनी त्या रुग्णास श्रीगोंद्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवले. येथे आल्यानंतर दिनांक २३ व २४ मे रोजी संध्याकाळपर्यंत त्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. दिनांक २४ मे संध्याकाळी ७:३० च्या दरम्यान त्यास जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.तेथे त्याचे स्त्राव नमुने घेण्यात आले. त्या अनुषंगाने आज संध्याकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव आला असल्याचे स्थानिक आरोग्य प्रशासनाच्या मार्फत समजले आहे. या प्रकरणाने श्रीगोंदा तालुक्यात कोरोणाचा शिरकाव झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम करत असलेल्या स्थानिक प्रशासनचे मुख्य तहसीलदार माळी, पोलीस निरीक्षक जाधव, डॉक्टर खामकर यांच्या प्रयत्नांमुळे संबंध तालुक्यामध्ये कोरोना रोखण्यात यश आले. तालुक्यात काही संशयित रुग्ण आढळले.मात्र, त्या सर्वांचे अहवाल निगेटिव आले, परंतु, शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर बाहेरून येणाऱ्या गावकऱ्यांच्या मार्फत शहरातील संक्रमण आता थेट गावापर्यंत पोहोचू लागले आहे.
असाच प्रकार परवा श्रीरामपूरच्या महाराज्यांच्या निमित्ताने समोर आला. तसेच, भाईंदर येथील महिला तिच्या गावी आल्यानंतर तीही पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आणि पुण्यातील घोरपडी येथून आलेला सदर इसम आज कोरोणा पॉझिटिव्ह आल्याने, बाहेर गावांवरून किंवा संक्रमण स्थळावरून गावाकडे येणाऱ्या लोकांमार्फत कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने, स्थानिक आरोग्य विभागाकडे माहिती देत, आपल्या प्रकृतीची तपासणी करून घेणे बंधनकारक झाले आहे. अनेक लोक छुप्या पद्धतीने स्थानिक प्रशासनाची कोणतीही मान्यता न घेता, थेट प्रवास करून गावी परतत असल्याने, अशा प्रकारचे प्रकरने समोर येऊ लागली आहेत. यामुळे स्थानिक आरोग्य विभागाचे काम मात्र वाढले आहे.
डॉक्टर नितीन खामकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बाधित व्यक्तीचा संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेऊन, श्रीगोंदा कारखाना येथील या व्यक्तीच्या राहत्या घरच्या आसपासचा परिसर ‘कंटेन्मेंट झोन’ करण्याची प्रक्रिया आज संध्याकाळी सुरू करण्यात आली असून, याठिकाणी सामान्य हालचालीवर प्रतिबंध घालण्यात येणार असल्याचे आता समजते आहे. कोणीही घाबरून न जाता प्रशासनाने केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. असेही आरोग्य विभाग मार्फत सांगण्यात येत आहे.
श्रीरामपूर येथील कोरणा संक्रमित महाराजांच्या संपर्कात आलेली श्रीगोंदा येथील व्यक्तीचा (डॉक्टर) अहवाल निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. याविषयी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.
